एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शंकराचार्यांच्या मुक्ताफळांची मालिका सुरुच, साईबाबांची तुलना राक्षसाशी
नवी दिल्ली: द्वारकापीठाचे स्वरुपानंद शंकराचार्य यांची वादग्रस्त विधानांची मालिका काही केल्या संपत नाही. आधी साईंमुळे महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे, असं म्हणणाऱ्या शंकराचार्यांनी आता साईबाबांची तुलना थेट राक्षशासी केली आहे. य़ाशिवाय भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंवर वारंवार हल्ला करुन त्यांना बळ देऊ नका. असाही सल्ला त्यांनी आपल्या भक्तांना दिला आहे.
स्वरुपानंद यांनी याआधीही महाराष्ट्रातला दुष्काळ हा साईबाबांची भक्ती केल्यामुळे उत्पन्न झाल्याचा दावा केला होता. इतकंच नाही, तर शनी शिंगणापूरसारख्या मंदिरांमध्ये महिलांनी प्रवेश केल्यास त्यांच्यावरचे अत्याचार वाढतील असा दावाही स्वरुपानंद यांनी केला होता.
दरम्यान, कालही शंकराचार्यांनी असंच चमत्कारिक विधान केलं. नवविवाहित जोडप्यांनी केदारनाथमध्ये हनिमून साजरा केल्यानंच केदारनाथमध्ये महाप्रलय आला, असं ते म्हणाले. ते हरिद्वार दौऱ्यावर असताना बोलत होते. केदारनाथासारख्या पवित्र भूमीमध्ये हनिमून साजरा केल्यानं अपवित्रता पसरली आणि त्यामुळेच अशा प्रलयांना निमंत्रण दिल्याचं अजब तर्कट स्वरुपानंद यांनी मांडलं.
संबंधित बातम्या:
'नवविवाहीत दाम्पत्यांच्या हनिमूनमुळेच केदारनाथमध्ये पूर', शंकराचार्यांचं अजब तर्कट
शिर्डीच्या साईबाबांच्या पुजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळ: शंकराचार्य स्वरुपानंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement