एक्स्प्लोर
नागपूरमध्ये लैंगिक अत्याचार करुन महिलेच्या हत्येचा प्रयत्न
महिलेवर लैंगिक अत्याचार करून आरोपीने तिला विष देऊन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर पीडित महिलेवर शासकीय रुग्णालयात उचार सुरु असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.
नागपूर : महिलेवर लैंगिक अत्याचार करून आरोपीने तिला विष देऊन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर पीडित महिलेवर शासकीय रुग्णालयात उचार सुरु असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.
नागपूरच्या भिवसखोरी परिसरातील घटना असून, शनिवारी या परिसरातील एक महिला आरोपी नंदू उयकेच्या घरी घरगुती साहित्य मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी लैंगिक अत्याचार केले. यानंतर आपलं कृत्य लपवण्यासाठी आरोपीने महिलेला मारहाण केली. आणि तिला विष पाजून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आरोपी ट्रक ड्रायव्हर असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या विरोधात बलात्कार आणि जिवे मारण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, महिलेला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement