एक्स्प्लोर

इंग्रजांनाही शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले होते! गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारला सांगितली आठवण

देशात शेतकऱ्यांची ताकद सर्वात मोठी असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केलं.शेतकऱ्यांपुढे इंग्रज सरकारला झुकावे लागले असल्याचा किस्सा त्यांनी सांगितला.

नवी दिल्ली :  दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले आहे. याच दरम्यान सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची सातत्याने मागणी होत आहे. राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधानांना शेतकरी आंदोलनाशी जोडलेला एक किस्सा सांगितला. एकेकाळी ब्रिटीश सरकारलाही शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले असल्याचे सांगत शेतकऱ्यांमध्ये किती ताकद असते याची मोदी सरकारला आठवण करुन दिली.

हे काही शेतकऱ्यांचे पहिले आदोलन नाही : आझाद गुलाम नबी आझाद म्हणाले की, सरकार आणि शेतकरी समोरासमोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. शेतकरी आंदोलनाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. कधी जमीनदार तर कधी सरकारविरूद्ध शेतकरी लढले आहे. सरकारला इंग्रजांच्या काळातही झुकावे लागले आहे.

शेतकऱ्यांसमोर तेव्हाही सरकार झुकलं होतं ते म्हणाले की, 1900 ते 1906 दरम्यान ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतात तीन कायदे लागू करण्यात आले होते. पंजाब लँड वसाहत अधिनियम 1900, अधिनियम 1906 आणि वसाहती अधिनियम 1906 या तीन कायद्यांमध्ये जमीनीची मालकी ब्रिटीश सरकारकडे येणार होती. यामुळे शेतकरी आपल्या अधिकारापासून वंचित राहणार होते.

या कायद्यांमध्येच इमारती बांधण्याचा, झाडे तोडण्याचा अधिकार नव्हता. मोठा मुलगा कुटुंबातील प्रमुख होणार नाही आणि जर त्याचा मृत्यू झाला तर जमीन लहान भावाच्या नावे हस्तांतरित केली जाणार नाही. यामुळे 1907 मध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आणि त्यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व सरकार अजितसिंग, (सरदार भगतसिंग यांचे मोठे बंधू) किशनसिंग जी, (भगतसिंग यांचे वडील) करत होते.

पूर्ण पंजाबमध्ये आंदोलन पसरले होते गुलाम नबी आझाद म्हणाले, हे आंदोलनचा लोट संपूर्ण पंजाबमध्ये पसरला होता. त्यावेळी बांकेलाल या लढ्याचे नेतृत्व करत होते. या आंदोलनात "पगड़ी संभाल जटा पगड़ी संभाल... सारे जग दा पेट भरे तूं, अन्नदाता कहलाए तूं.. हे त्यांनी लिहलेलं गीत खूप गाजलं होतं.

या गाण्याने शेतकर्‍यांमध्ये नवा उत्साह, नवीन जागृती निर्माण केली. लाला लाजपत राय यांनीही या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. सरकारने त्या विधेयकात दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला आणि काही सुधारणा केल्या. मात्र, त्यानंतर, गुजरांवाला, लाहोर आणि इतरत्र वेगवान आंदोलन झाले. त्यानंतर तिन्ही बिले सरकारला परत घ्यावी लागली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget