एक्स्प्लोर

मोठी बातमी : लोकसभेत सुरक्षेत मोठी चूक, अज्ञाताची प्रेक्षक गॅलरीतून उडी, स्मोक कँडल जाळल्या

Security Breach In Lok Sabha 2023: लोकसभा सुरू असतानाच तिघांनी लोकसभेची सुरक्षा भेदली अन् प्रेक्ष गॅलरीतून थेट उडी घेतली.

Parliament Winter Session 2023: नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session 2023) सुरु असताना, सुरक्षेत मोठी चूक (Security Breach) झाल्याचं समोर आलं आहे. कारण प्रेक्षत गॅलरीत (Audience Gallery) बसलेल्या एकाने खाली उडी मारली. भर लोकसभेत (Lok Sabha) हा प्रकार घडल्याने काहीसा गोंधळ उडाला. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. त्याच्याकडे कलर स्प्रे (Color Spray) असल्याची माहिती मिळत आहे. स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळली.  लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

दोन लोक खाली पडले. त्यानंतर अचानक धूर सुरु झाला. या दोघांना पकडण्यात आलं.या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज थांबवण्यात आलं आहे, अशी माहिती एका खासदाराने दिली. तसेच, प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सभागृहात गोंधळ घालणाऱ्या तरुणाला खासदार मनोज कोटक यांनी पकडलं आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिलं. 

लोकसभेत नेमकं काय घडलं?

संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. नेहमीप्रमाणे लोकसभेचं कामकाज सुरु होते. प्रेक्षक गॅलरीतून काही लोक कामकाज पाहात होते. अधिवेशन काळात संसदेला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे गॅलरीत प्रेक्षकांची गर्दी होती. या गर्दीत तीन जण होते, त्यातील दोघांनी गॅलरीतून खाली जिथे सर्व खासदार बसून कामकाज करत असतात, तिथे उडी मारली. त्यांच्याकडे अश्रूधूर सदृश्य वस्तू होती. 

लक्ष वेधण्यासाठी स्मोक कँडल 

दरम्यान, ज्या व्यक्तीनं गॅलरीतून उडी मारली त्यापैकी एकाचं नाव सागर असल्याचं समजतं. तो कर्नाटकातील म्हैसूरच्या खासदाराच्या ओळखीने आल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल पेटवले. 

संसदेबाहेर दोघांचं आंदोलन, महाराष्ट्रातील तरुण ताब्यात 

संसदेबाहेरही दोन व्यक्तींनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी एक तरुण आणि एक महिला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. रंगीत धुराच्या नळकांड्या या दोघांनी संसदेबाहेर जाळल्या. तसेच, दोघांनीही घोषणाबाजीही केली. महत्त्वाची बाब म्हणजे, दोघांपैकी एक मुलगा महाराष्ट्रातील आहे. 25 वर्षांचा अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तर लोकसभेबाहेर गोंधळ घालणारी 42 वर्षीय नीलम हरियाणातील हिस्सार भागातील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. 

पाहा व्हिडीओ : Parliament Security Breach : संसदेत घुसुन सभागृहात उडी, स्मोक कँडल जाळल्या, खासदारांची पळापळ

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

लातूरचा तरुण दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, संसदेबाहेर पिवळ्या धुराच्या नळकांड्यासह आंदोलन, सुरक्षा भेदल्याने कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget