लातूरचा तरुण दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, संसदेबाहेर पिवळ्या धुराच्या नळकांड्यासह आंदोलन, सुरक्षा भेदल्याने कारवाई
लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामधील एक तरुण महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत आहे.
Security Breach In Lok Sabha: नवी दिल्ली : संसदेत (Parliament Winter Session 2023) प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सुरक्षा भेदल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. प्रेक्षक गॅलरीतून (Audience Gallery) दोघांनी उडी मारल्याने भर लोकसभेत (Lok Sabha) एकच हल्लकल्लोळ माजला. त्याचदरम्यान लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात (Security Breach) घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील (Maharashtra News) लातूर जिल्ह्यातला (Latur District) आहे. लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही 42 वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर 25 वर्षीय अमोल शिंदे (Amol Shinde) हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
हे दोन्हीही आरोपी दिल्लीतील (Delhi) संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे आंदोलन करत होते. या दोघांकडे कलर स्मोक होते. त्यामुळे नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं.
Incident is being verified. Initial questioning related to security breach and who gave access. Finding out if any connection with those who jumped inside. Multi-agency questioning also likely: Delhi Police sources https://t.co/WTaMsDnfSe
— ANI (@ANI) December 13, 2023
अमोल शिंदे मूळचा लातूरचा
दरम्यान, अमोल धनराज शिंदे हा सुद्धा संसदेबाहेरील आंदोलनात सहभागी होता. ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे हे आंदोलन सुरु होतं. त्यावेळी या आंदोलकांकडे कलर स्मोक अर्थात पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या सापडल्याने सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत, आंदोलकांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांपैकी एक अमोल शिंदे नावाच तरुण मूळचा लातूर जिल्ह्यातील आहे.
संसदेबाहेर दोघांचं आंदोलन, महाराष्ट्रातील तरुण ताब्यात
संसदेबाहेरही दोन व्यक्तींनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी एक तरुण आणि एक महिला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. रंगीत धुराच्या नळकांड्या या दोघांनी संसदेबाहेर जाळल्या. तसेच, दोघांनीही घोषणाबाजीही केली. महत्त्वाची बाब म्हणजे, दोघांपैकी एक मुलगा महाराष्ट्रातील आहे. 25 वर्षांचा अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तर लोकसभेबाहेर गोंधळ घालणारी 42 वर्षीय नीलम हरियाणातील हिस्सार भागातील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : Supriya Sule on Parliament Security : संसदेत घुसखोरी, सभागृहात हजर सुप्रिया सुळेंनी सांगितला थरार
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी : लोकसभेत सुरक्षेत मोठी चूक, अज्ञाताची प्रेक्षक गॅलरीतून उडी, स्मोक कँडल जाळल्या