एक्स्प्लोर
'कोहिनूर भारतात परत आणणं अशक्य', केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती
नवी दिल्ली: इंग्लंडमधून कोहिनूर हिरा भारतात परत आणण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. याच प्रकरणी सुनावणी दरम्यान आज केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात महत्वाची माहिती दिली.
'कोहिनूर हिरा परत आणणं शक्य नाही. कारण की, कोहिनूर हिरा चोरी केला गेला नव्हता अथवा जबरदस्तीने नेलाही नव्हता. हा हिरा महाराज रणजीत सिंह यांनी ईस्ट इंडिया कंपनीला स्वत:हून दिला होता.' अशी माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली.
'तुम्हाला असं वाटतं की ही याचिका फेटाळण्यात यावी? जर असं केल्यास कोहिनूरवरील भारताचा दावा कायमसाठी कमकुवत होईल. असं म्हटलं जाईल की, भारताच्या सर्वात मोठ्या कोर्टानं आता हा फैसला दिला आहे.' केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनंतर सरन्यायाधीश यांनी केंद्राला सुनावलं.
दरम्यान, कोहिनूर हिरा देशात परत आणण्यासंबंधी केंद्र सरकार कोणते प्रयत्न करीत आहेत. याची माहिती देण्यासाठी कोर्टानं सरकारला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे.
संबंधित बातम्या:
VIDEO: कोहिनूर हिरा लंडनमध्ये कसा पोहोचला?
भारताचा कोहिनूर हिरा ब्रिटनकडून पाकला हवा, लाहोर कोर्टात याचिका
कोहिनूर हिरा भारताला परत करावा : ब्रिटीश खासदार किथ वाझ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement