एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चलनकोंडी फुटायला फेब्रुवारी उजाडेल : अरुंधती भट्टाचार्य
मुंबई : नोटाबंदीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 दिवसांची डेडलाईन दिली आहे. ती आता येत्या सात दिवसात पूर्ण होणार आहे. पण हा चलनकल्लोळ येत्या सात दिवसात कमी होणार नाही, तर त्यासाठी किमान फेब्रुवारी उजाडेल, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितलं.
एटीएम मशिन्स लोकांच्या जगण्याचा भाग झाल्या आहेत. त्यामुळे एटीएममधून रक्कम काढण्याची मर्यादा वाढवायला हवी, असे अरुंधती भट्टाचार्य यांनी सूचवलं आहे. शिवाय, 15 डिसेंबरपासून 500 च्या नोटांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे 500 च्या नोटा चलनात वाढल्या की, सुट्ट्या पैशांचा प्रश्न मिटेल, असा विश्वासही अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केला.
काळा पैसा आणि बनावट नोटा यांविरोधातील लढाईला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर देशभरातील अनेकांचे व्यवहार कोलमडले, बँकांबाहेर लोकांच्या रांगा लागल्या, एटीएममध्येही अनेक ठिकाणी रक्कम उपलब्ध नव्हती अशा सर्व गोष्टींमुळे देशात एकप्रकारचा गोंधळ पाहायला मिळाला.
अरुंधती भट्टाचार्य यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे -
- नोटाबंदीमुळे 80 टक्के चलन रद्द, ते पुन्हा बाजारात येण्यासाठी फेब्रुवारी उजाडणार – अरुंधती भट्टाचार्य
- एटीएम लोकांच्या जगण्याचा भाग, एटीएममधून रक्कम काढण्याची मर्यादा वाढवावी – अरुंधती भट्टाचार्य
- 15 डिसेंबरपासून 500 च्या नोटांचा ओघ वाढला – अरुंधती भट्टाचार्य
- 500 च्या नव्या नोटा बऱ्यापैकी चलनात आल्यानंतरच लोकांच्या अडचणी दूर होतील – अरुंधती भट्टाचार्य
- 500 च्या नोटांमुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न मिटेल – अरुंधती भट्टाचार्य
- बँकेत मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे – अरुंधथी भट्टाचार्य
- जास्त रकमेच्या रोखीच्या व्यवहारावर टॅक्स लावावा – अरुंधती भट्टाचार्य
- कॅशलेस व्यवहारासाठी एसीबीआयचं पाऊल - अरुंधती भट्टाचार्य
- ईएमआय कमी होईल – अरुंधती भट्टाचार्य
- कमी रकमेचा व्यवहार करणाऱ्यांवर टॅक्स नको - अरुंधती भट्टाचार्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक
भारत
Advertisement