एक्स्प्लोर

"हिटलरने राजीनामा दिला नव्हता, आत्महत्या केली होती, एकनाथ शिंदेही राजीनामा देणार नाहीत"

सरकारला राम मंदिरचे (Ram Mandir) उद्घाटन करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे.

Sanjay Raut : लोकशाहीच्या मंदिरात तुम्ही लोकशाहीचे हत्याकांड करता. सरकारला राम मंदिरचे (Ram Mandir) उद्घाटन करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. आम्हाला ते निमंत्रण देणार नाहीत. कारण आम्ही आमचं त्यात योगदान आहे. आम्ही त्या प्रकरणातील आरोपी आहोत. ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा असल्याचे मत राऊतांनी व्यक्त केलं. यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार नाहीत, कारण ते कोडगे आहेत. कोडगे लोक कधी राजीनामा देत नाहीत. हिटलरने राजीनामा दिला नव्हता, आत्महत्या केली होती, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत कारण...

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार नाहीत, कारण ते कोडगे आहेत. कोडगे लोक कधी राजीनामा देत नाहीत. हिटलरने राजीनामा दिला नव्हता, आत्महत्या केली होती, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. भाजपने लिहून दिलेलं भाषण एकनाथ शिंदेंनी सभागृहात वाचून दाखवलं आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं गेलं होतं. यामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या घोटाळ्याची चौकशी करा. चिमण आबा पाटील यांच्या मागणीनुसार चौकशी करा, मग मुंबई महापालिकेत या असे संजय राऊत म्हणाले. 

 

राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे महाराष्ट्रात कोणाला निमंत्रण?

आयोध्येतील राममंदिर उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरमधील (Pandharpur) अनेकांना निमंत्रण मिळाले असून, वारकरी संप्रदाय आणि संत विभूती या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत. राममंदिराचा लढा गेले कित्येक वर्षे चालल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होत असताना, या सोहळ्याला वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बडवे समाजातील थोर संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज, रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात, देवाचे सेवाधारी आणि ज्याच्याघरी 400 वर्षांपासून पांडुरंगाच्या पादुका असणारे हरिदास अशा मान्यवरांना राम मंदिर केंद्रीय समितीकडून उदघाटन सोहळ्यासाठी निमंत्रण प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील इतिहासातील 300 वर्षांपूर्वी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला देखील त्यावेळी प्रल्हाद महाराज बडवे याना निमंत्रण मिळाल्याचा इतिहास आहे. 22 जानेवारीला नियोजित या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून, निमंत्रितामध्ये कलाकार, कवी, उद्योगपती, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, राममंदिर संघर्षात प्राण गमावलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. 

पांडुरंगाचे परंपरागत प्रमुख पुजारी म्हणून बडवे यांच्यासह सेवेधारी मंडळी पैकी पांडुरंगाच्या पादुका असणाऱ्या काल्याच्या वाड्यातील मदन महाराज हरिदास यांच्याबरोबर रूक्मिणीचे वंशपरंपरागत पुजारी उत्पात यांनाही खास निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्रची थोर संत व वारकरी संप्रदायाचे महत्व जाणून महान संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या वंशज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विश्वस्त वासकर महाराजांबरोबर, देगलूरकर महाराज व इतर महत्त्वाचे परंपरा जोपासणाऱ्या साधुसंतांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

 देशातील 4000 ऋषी आमंत्रित

मुख्य समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेचे सुमारे 100 सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 25 अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. तर, माजी पंतप्रधान देवेगौडा यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी तीन सदस्यीय चमू तयार करण्यात आले आहे. यासह शंकराचार्य सुद्धा सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यासाठी सुमारे 4000 ऋषी आणि 2200 इतर पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी यांसारख्या मंदिरांचे प्रमुख आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. पंढरपूरमधील व्यक्तींना आमंत्रित करताना वारकरी परंपरा जोपासणाऱ्या साधुसंतांना आमंत्रित केल्याने विशेष आनंद या मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on Devendra Fadnavis : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?ABP Majha Headlines :  10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHABaba Siddique Case  Update :  बाबा सिद्दीकी प्रकरणी आरोपीकडून कटाची माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on Devendra Fadnavis : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Embed widget