एक्स्प्लोर

Success Story : बस ड्रायव्हरच्या मुलीची 'गगन भरारी'; लहान मुलांना शिकवून भरली स्वत:ची फी, वाचा सनाच्या संघर्षाची कहाणी

Sana Ali : सना अली हिची इस्त्रोमध्ये (ISRO) टेक्निकल असिस्टेंट पदावर निवड झाली आहे. सनाचे वडील बस ड्रायव्हर आहेत.

Sana Ali Selected in ISRO : मेहनत आणि जिद्द या जोरावर तुम्ही कोणतंही ध्येय साध्य करु शकता, हे एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने करुन दाखवलं आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका बस ड्रायव्हरच्या (Bus Driver) मुलीने 'अवकाश भरारी' मारली आहे. मध्य प्रदेशातील सना अली हिची इस्त्रो (ISRO) म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) मध्ये निवड झाली आहे. सना अली हिची इस्रोमध्ये (ISRO) तांत्रिक सहाय्यक म्हणजेच टेक्निकल असिस्टेंट इंजिनिअर (Technical Assistant)  पदावर निवड झाली आहे. 

बस ड्रायव्हरच्या मुलीची ISRO मध्ये निवड

अथक परिश्रमानंतर सनाचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता सना अली टेक्निकल असिस्टेंट इंजिनिअर (Technical Assistant) म्हणून इस्रोमध्ये (ISRO) रुजू होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनीही यानिमित्ताने सना अली आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे. जिथे इच्छा तिथे मार्ग ही म्हण सना अलीने खरी करुन दाखवली आहे. 

सना अली मध्य प्रदेशची रहिवासी

सना अली ही मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) रहिवासी आहे. मध्य प्रदेशातील विदिशा (Vidhisha) निकसा मोहल्ला या भागात सना तिच्या कुटुंबासोबत राहते. तिचे वडील साजिद अली (Sajid Ali) एक बस ड्रायव्हर आहेत. साजिद अली यांचे कुटुंब एका पडक्या घरात वास्तव्यास आहे. साजिद अली यांची मुलगी सना अली लहानपणापासून अभ्यासात फार हुशार आहे. 

लहान मुलांचे ट्यूशन घेऊन भरली फी 

आर्थिक अडचणींमुळे सना अलीने प्रसंगी लहान मुलांचे ट्यूशन घेऊन स्वत:च्या शिक्षणासाठी फी भरली. तिने हे यश मिळवण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. सनाला अंतराळ आणि त्यातील रहस्यांमध्ये सुरुवातीपासूनच खूप आवड होती. यामुळे सनाचे इस्रोमध्ये (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) जाण्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली.

सना अलीची सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये निवड

सनाचे इस्रोमध्ये जाण्याचे स्वप्न काही सोपे नव्हते. यामध्ये सर्वात मोठा अडथळा होता आर्थिक चणचण. आई-वडिलांनी सनाला शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. वडिलांनी नातेवाईकांकडून पैसे उसणे घेऊन सनाच्या शिक्षणासाठी खर्च केला. तिच्या आईने तिचे मौल्यवान दागिने गहाण ठेवले. 

सनाने एसएटी कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनीअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. सना अलीची सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये तांत्रिक सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सना अली आणि त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

NASA : शास्त्रज्ञांनी शोधली दुसरी 'पृथ्वी', आकारही समान; इथेही मानवाचं वास्तव्य?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special ReportTanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP MajhaBharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
Embed widget