एक्स्प्लोर

Parliament News : राज्यसभेचा खासदार की लोकसभेचा खासदार, कुणाला जास्त वेतन? कुणाची जास्त पॉवर आणि विशेषाधिकार?

Parliament MP Salary : राज्यसभेच्या खासदारांच्या हक्कांबद्दल बोलायचे झाले तर लोकसभा खासदारांप्रमाणेच त्यांनाही अनेक प्रकारचे अधिकार दिले असतात. पण राज्यसभा खासदारांना आणखी दोन विशेष अधिकार आहेत. 

मुंबई : लोकसभेची निवडणूक झाली आणि सर्वाधिक खासदार असलेले एनडीए सरकार सत्तेत आलं. लोकसभेत बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले राजकीय पक्ष रा्ज्यसभेतही बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण लोकसभेचा खासदार मोठा असतो की राज्यसभेचा खासदार असा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच लोकसभेच्या खासदाराकडे जास्त पॉवर असतात की राज्यसभेच्या खासदाराकडे असा प्रश्नदेखील अनेकांना पडतो. 

लोकसभेतील आणि राज्यसभेतील खासदारांना किती पगार मिळतोय याची माहिती घेऊयात. त्याशिवाय या दोन्ही सभागृहांच्या खासदारांना कोणते अधिकार असतात हेदेखील पाहुयात. 

लोकसभा खासदाराचे वेतन किती? 

लोकसभा खासदाराचे मूळ वेतन दरमहा एक लाख रुपये आहे. याशिवाय खासदारांना अनेक प्रकारचे भत्तेही दिले जातात. ज्यामध्ये दररोज 2,000 रुपये भत्ता, दरमहा 70 हजार रुपये निवडणूक भत्ता, दरमहा 60 हजार रुपये कार्यालय भत्ता आणि टेलिफोन, घर, पाणी, वीज, पेन्शन, प्रवास भत्ता या सुविधांचा समावेश आहे.

लोकसभेच्या खासदारांना अधिकार किती?

लोकसभा खासदारांच्या अधिकारांबद्दल बोलायचं झालं तर तर त्यांना प्रामुख्याने तीन अधिकार असतात. यातील पहिला म्हणजे संसदेत प्रस्तावित केलेल्या कायद्यांवर मतदान करण्याचा अधिकार. दुसरा म्हणजे संसदेतील चर्चेत भाग घेण्याचा अधिकार आणि तिसरा म्हणजे सरकारच्या कामकाजाशी संबंधित प्रश्न विचारण्याचा अधिकार. 

खासदारांच्या कामाबद्दल बोलायचे तर कायदे करणे, सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, सरकारला सल्ला देणे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित चर्चांमध्ये भाग घेणे हे लोकसभा खासदारांचे काम असते.

राज्यसभेच्या खासदाराचा पगार किती?

राज्यसभेच्या खासदारांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर त्यांना दरमहा 2 लाख 10 हजार रुपये मिळतात. यातील 20 हजार रुपये कार्यालयीन खर्चासाठी आहेत. तर मूळ वेतनाबद्दल बोलायचे झाले तर ते 1 लाख 90 हजार रुपये आहे. मात्र त्यात अनेक प्रकारच्या भत्त्यांचाही समावेश आहे.

राज्यसभेच्या खासदारांना अधिकार कोणते? 

राज्यसभेच्या खासदारांच्या हक्कांबद्दल बोलायचे झाले तर लोकसभा खासदारांप्रमाणेच राज्यसभेच्या खासदारांनाही अनेक प्रकारचे अधिकार मिळाले आहेत. जसे घटनादुरुस्ती करण्याचे अधिकार, कार्यकारी अधिकार, आर्थिक अधिकार आणि विविध अधिकार. 

या व्यतिरिक्त राज्यसभेच्या खासदारांना दोन विशेष अधिकार मिळाले आहेत जे लोकसभेच्या खासदारांना नाहीत. यामध्ये राज्यघटनेच्या कलम 294 अन्वये पहिला अधिकार देण्यात आला आहे. राज्यसभेत उपस्थित असलेल्या आणि मतदानात भाग घेणाऱ्या खासदारांच्या दोन तृतीयांश बहुमताने राज्य यादीतील कोणताही विषय राष्ट्रीय महत्त्वाचा विषय म्हणून घोषित केला जाऊ शकतो. असा प्रस्ताव राज्यसभेने मंजूर केल्यास संसद त्या विषयावर कायदा करू शकते.

दुसरा अधिकार राज्यघटनेच्या कलम 312 अंतर्गत देण्यात आला आहे. यानुसार राज्यसभा दोन तृतीयांश बहुमताने ठराव मंजूर करून केंद्र सरकारला नवीन अखिल भारतीय सेवा स्थापन करण्याचे अधिकार देऊ शकते. तर लोकसभा हे करू शकत नाही. याशिवाय जोपर्यंत राज्यसभा असा प्रस्ताव मंजूर करत नाही तोपर्यंत संसद किंवा भारत सरकार कोणत्याही नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती करू शकत नाही.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : जॉब माझा : आदिवासी विकास विभाग येथे नोकरीची संधी : 09 Nov 2024 : ABP MajhaDevendra Fadnavis Meet Vinod Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा नेते विनोद पाटलांच्या भेटीलाVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरMuddyach Bola | छत्रपती संभाजीनगरचा गड कोण राखणार? शिवसेनेची हवा कशी? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Embed widget