एक्स्प्लोर

'नोटाबंदी म्हणजे आर्थिक अराजक', शिवसेनेची थेट मोदींवर टीका

मुंबई: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावर आता शिवसेनेनंही टीका सुरु केली आहे. मोदींच्या भाषणातील अनेक मुद्दे हे यूपीएच्या काळातीलच आहेत. असा असा दावा 'सामना'च्या अग्रलेखातून केला गेला आहे. 'देशातील आर्थिक अराजक मानवी संहारास आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो.' अशी घणाघाती टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी घोषणांमधून एकप्रकारे येत्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत अर्थमंत्री अरुण जेटलींचा भार हलका केला. अशी खोचक टीकाही करण्यात आली आहे. एक नजर 'सामना'च्या अग्रलेखावर: पंतप्रधान व छोटूलाल * मोदी हे आभाराचे भाषण हसतमुखाने करीत असताना बाराबंकी येथील बडागावात राहणार्‍या छोटूलाल या मुलाला आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही बँकेने पैसे दिले नाहीत. छोटूलाल हा जिवंतपणीच मेला व चारशेच्या वर लोक प्रत्यक्ष बँकांच्या रांगेत मरण पावले. त्यामुळे पंतप्रधानांनी ज्या नवीन घोषणांचा पाऊस पाडला तो अशा छोटूलालसाठी उपयोगाचा नाही. पंतप्रधान मोदी यांच्यावर आमचा लोभ आहे व राहणारच, पण देशातील आर्थिक अराजक मानवी संहारास आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो. * नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येस पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी केलेले कोणतेही भाषण हे देशवासीयांना उद्देशून केलेले आहे, असे मानण्याची प्रथा आहे. मोदी यांच्या भाषणाबाबतही तसेच म्हणावे लागेल. मोदी हे भाषणात घोषणा करतात की धमक्या देतात अशी चिंता सगळ्यांना लागून राहिली होती. पण डोक्याला ताप नको व नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येस काही अशुभ कानी पडू नये म्हणून लोकांनी आपापल्यापरीने नवीन वर्ष आगमनाचा आनंद काटकसरीने साजरा केला. अर्थात मोदी यांच्या भाषणात तसे भीतीचे व चिंतेचे काहीच नव्हते. मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा भार हलका केला. *  वृत्तवाहिन्यांवरून एकप्रकारे अर्थसंकल्पातील घोषणांचा पाऊस मोदी यांनी आधीच पाडल्याने जेटली यांचे काम सोपे करून टाकले आहे. आता फेब्रुवारी महिन्यात सादर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री नवे काय करणार हा प्रश्‍नच आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला चूड लावली असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेचे, मोलमजुरी करून जगणार्‍यांचे कंबरडे मोडले. आज पन्नास दिवसांनंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. लोकांच्या यातनांवर मोदी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फुंकर घालतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी फार गांभीर्याने भाषण केल्याचे दिसले नाही. * बाराबंकी येथील बडागावात राहणार्‍या छोटूलाल या मुलाला आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही बँकेने पैसे दिले नाहीत. त्यामुळे घरातील गहू विकून आईवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ या मुलावर आली. छोटूलालचे बँकेत थोडेफार पैसे होते. आईच्या उपचारासाठी पैसे मिळावेत म्हणून तो दोन दिवस बँकेच्या रांगेत उभा राहिला. उपचारांसाठी सोडाच, पण अंत्यसंस्कारासाठीही बँकेतून दोनेक हजार रुपये मिळू शकले नाहीत. असे लाखो छोटूलाल आज सरकारला शाप देत आहेत. त्यांच्यावर आभार प्रदर्शनाची शब्दसुमने उधळून काय होणार? छोटूलाल हा जिवंतपणीच मेला व चारशेच्या वर लोक प्रत्यक्ष बँकांच्या रांगेत मरण पावले. त्यामुळे पंतप्रधानांनी ज्या नवीन घोषणांचा पाऊस पाडला तो अशा छोटूलालसाठी उपयोगाचा नाही. पंतप्रधानांनी ज्या घोषणांची आतषबाजी केली त्यापैकी अनेक घोषणा जुन्याच आहेत व ‘यूपीए’ सरकारच्या काळापासून चालू आहेत. * मुळात लोकांना मोदी यांच्याकडून वेगळ्याच अपेक्षा होत्या. ‘नोटाबंदी’मुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेला दिलासा कधी मिळेल याचे ठाम उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही. कारण त्यांच्याकडे बहुधा उत्तरच नसावे. दुसरे असे की, नोटाबंदीनंतर किती काळा पैसा वसूल झाला याचा आकडाही पंतप्रधानांकडे नाही. मग लोकांचे इतके निर्घृण हाल का केले ते सांगावे व नव्या वर्षात तुम्हाला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवेत ते जाहीर करावे. पंतप्रधान मोदी यांच्यावर आमचा लोभ आहे व राहणारच, पण देशातील आर्थिक अराजक मानवी संहारास आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो. छोटूलाल व त्याची माता मरत असेल तर मरू दे. माय मरो पण नोटाबंदी राहो असेच हे धोरण आहे. छोटूलालच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

व्हिडीओ

Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
Salman Khan Birthday: इकडं भाईजान साठीत पोहोचला, तिकडं एका मुलाची आई झालेल्या कॅटरिनाच्या हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या
इकडं भाईजान साठीत पोहोचला, तिकडं एका मुलाची आई झालेल्या कॅटरिनाच्या हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या
WTC Point Table : इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानं WTC गुणतालिकेत उलटफेर, टीम इंडियाला फायदा की तोटा, जाणून घ्या
इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानं WTC गुणतालिकेत उलटफेर, टीम इंडियाला फायदा की तोटा, जाणून घ्या
ह्रदयद्रावक... विहिरीतील मोटार काढताना विजेचा धक्का; बाप लेकासह चौघांचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... विहिरीतील मोटार काढताना विजेचा धक्का; बाप लेकासह चौघांचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Embed widget