एक्स्प्लोर

Russia Ukraine War: जनरल व्ही.के. सिंह युक्रेन-पोलंड सीमेवर; अडकलेल्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Russia Ukraine War: ऑपरेशन गंगा अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे युक्रेन- पोलंड सीमेवर पोहोचले आहेत. युक्रेनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.

नवी दिल्ली:शिया- युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आता केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह पोहोचले असून त्यांनी युक्रेन-पोलंडच्या सीमेवर बुडोमेझ या ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना खाद्यपदार्थ आणि पाण्याचे वाटप केलं. भारतीय विद्यार्थ्यांचे मनोबल हे उंचावलं आहे आणि त्यामुळे मी प्रभावित झालो आहे असं जनरल व्ही.के सिंह म्हणाले. त्यांनी या संबंधी एक ट्वीट केलं आहे. जनरल व्ही. के. सिंह यांचा या संबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 

युक्रेनमधून हे विद्यार्थी पोलंडच्या सीमेपर्यंत आले असून त्यांना लवकरच पोलंडमध्ये प्रवेश देण्यात येईल आणि सुखरुप मायदेशी परत आणण्यात येईल असं जनरल व्ही. के. सिंह म्हणाले.

 

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चाललीय. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून 'ऑपरेशन गंगा' अभियान राबवलं जातंय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडकडून मदतीचा हात मिळतोय. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह पोलंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पोलंडमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चर्चा केली असून त्यांना सुखरुप मायदेशी नेणार असल्याचे आश्वासनही  दिले आहे. यावेळी भारताचे पोलंडमधील राजदूत नगमा मल्लिक हे उपस्थित होते.

भारतीयांच्या सुटकेसाठी चार मंत्री युक्रेन शेजारील देशांमध्ये
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठवण्यात आलं आहे. त्यात रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंग पोलंडमध्ये पोहोचलेत. युक्रेनमधून भारतीय मोठ्या संख्येनं पोलंडच्या सीमेवर दाखल झाले आहेत. भारतीयांच्या प्रवासात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी भारतीय दूतावासाकडून प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये दाखल झाले आहेत. युक्रेनमधून बुखारेस्टमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनीही संवाद साधला.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पोलंडचे राष्ट्रपती अँड्रेज डुडा यांच्याशी चर्चा केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी मदत केल्याबाबत मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत. 

संबंधित बातम्या:  

महत्त्वाच्या बातम्या

Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
CJP Protest : मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद, आजच्या आंदोलनाचं श्रेय सरन्यायाधीशांना; संजय राऊतांचा टोला
मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद, आजच्या आंदोलनाचं श्रेय सरन्यायाधीशांना; संजय राऊतांचा टोला
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Embed widget