एक्स्प्लोर

Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

RSS Chief Mumbai Student Interaction : LGBT समुदाय समाजाचाच भाग, पण कौटुंबिक व्यवस्थेत बदल करताना सामाजिक स्वीकार्यता अन् कायदेशीर चौकट गरजेची असल्याचं मत डॉ. मोहन भागवतांनी व्यक्त केलं.

मुंबई : आपल्याकडे फक्त दोन लोकांनी एकत्र राहण्यासाठी विवाहसंस्थेची निर्मिती केली नाही, तर त्यातून कुटुंब आणि पुढची पीढी निर्माण करण्याचा उद्देश आहे. परंतु जर समलैंगिक विवाहासंबंधी लोकांना शिक्षित केलं, योग्य कायदा केला, तर समाज त्यांना स्वीकारेल असं मोठं वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं. विवाह आणि कुटुंबाशी जोडलेल्या पारंपरिक व्यवस्थेत बदल करताना सामाजिक स्वीकार्यता आणि योग्य कायदेशीर चौकटीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात 'जेन-जी' (Gen Z) आणि 'जेन अल्फा' (Gen Alpha) च्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी समलैंगिक विवाह, छात्र आंदोलने, देशाची शिक्षण व्यवस्था तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विविध प्रश्न विचारले. याप्रसंगी मोहन भागवत यांनी एलजीबीटी (LGBT) समुदाय हा समाजाचाच एक भाग असल्याचे स्पष्ट केले.

Mohan Bhagwat Interview : काय म्हणाले सरसंघचालक? 

समलैंगिक विवाहावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, "हे सगळे आपल्या समाजाचा भाग आहेत. आपल्या समाजामध्ये सर्वांना सामावून घेण्याची प्रथा आहे. आपल्या परंपरेमध्ये फक्त दोन व्यक्तींना एकत्र राहण्यासाठी विवाहसंस्थेची तरतूद नाही. तर कुटुंब आणि पुढची पीढी निर्माण करण्यासाठी ती व्यवस्था आहे. त्यामध्ये आई-वडिलांचा समावेश आहे. आता सध्या असलेली व्यवस्था आपण अचानक डिस्टर्ब केली आणि नवी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. या दोन्ही व्यवस्था आपण मिक्स करू शकत नाही. त्यासाठी आधी समाजाला शिक्षित केलं पाहिजे. त्यामुळे अशी व्यवस्था निर्माण करायला हवी की या सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. त्यामुळे समलैंगिक विवाहासाठी योग्य कायद्याची गरज आहे, त्यावेळी समाजही त्याला स्वीकारेल."

वर्षांनुवर्षे चालत आलेल्या या व्यवस्थेत अचानक बदल करताना समाजात कोणताही अंतर्गत संघर्ष निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सध्याची व्यवस्था बदलली जात असेल, तर त्याच्या जागी अशी नवीन व्यवस्था निर्माण व्हायला हवी, जी संपूर्ण समाजाला सहज स्वीकारार्ह असेल. त्यामुळे कायदे आणि सामाजिक व्यवस्था यांच्यात योग्य ताळमेळ असणे अत्यंत गरजेचे आहे, असे मोहन भागवत म्हणाले. 

Student Movements & Democracy : विद्यार्थी आंदोलने संवादाचे माध्यम

विद्यार्थी आंदोलनांबद्दल बोलताना सरसंघचालक म्हणाले की, "लोकशाहीत आंदोलने हे देखील आपले म्हणणे मांडण्याचे आणि व्यवस्थेशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. जेव्हा तरुणांना वाटते की त्यांच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, तेव्हा ते आंदोलनाचा मार्ग निवडतात. कोणत्याही मुद्द्याला केवळ निरर्थक वादात अडकवून ठेवण्यापेक्षा चर्चा, संवाद आणि सर्वसंमतीच्या (Consensus) माध्यमातून शांततेने मार्ग काढण्यावर भर दिला पाहिजे."

ही बातमी वाचा :

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget