RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ख्रिश्चनांना आकर्षित करणार! प्रथमच ख्रिसमस डिनरचे आयोजन, काश्मीर ते केरळमधील चर्च प्रमुख येणार
RSS : RSS शी संलग्न राष्ट्रीय ख्रिश्चन फोरमच्या या कार्यक्रमात जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंतचे चर्चप्रमुख सहभागी होणार आहेत.
RSS : कोरोना महामारीमुळे (Corona) दोन वर्षांपासून मर्यादित असलेला ख्रिसमसचा (Christmas 2022) सण यावेळी मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. ख्रिसमसच्या या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक मोठा पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) देखील आता ख्रिश्चन समाजाला जोडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. आज प्रथमच केंद्रीय राज्यमंत्री जॉन बार्ला यांच्याकडून मेघालय हाऊसमध्ये ख्रिसमस डिनरचे (Christmas Dinner) आयोजन करण्यात येत आहेत. RSS शी संलग्न राष्ट्रीय ख्रिश्चन फोरमच्या या कार्यक्रमात जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंतचे चर्चप्रमुख सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील चर्च प्रमुखांनाही राष्ट्रीय ख्रिश्चन मंचातर्फे निमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे
ख्रिश्चनांसाठी काम करणार RSS, पहिल्यांदाच ख्रिसमस साजरी करणार
भोजन हे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून, चर्च प्रमुखांनी व्होट बँकेच्या राजकारणाचा भाग बनू नये. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने चर्च प्रमुखांना सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयानंतर ख्रिश्चन समुदायही संघ आणि भाजपपासून अधिक अंतर ठेवण्याच्या बाजूने नसल्याचे जाणकारांचे मत आहे. अशा परिस्थितीत संघातर्फे नाताळ सणाचे आयोजन राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या सणाची एक उल्लेखनीय बाब म्हणजे केरळमधील पाया मजबूत करण्यासाठी काश्मीर ते केरळपर्यंत ख्रिस्ती प्रतिनिधींना यात आमंत्रित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील चर्च प्रमुख आणि ख्रिश्चन प्रतिनिधींनाही मेजवानीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
अत्यंत महत्त्वाचे पाऊल
केरळ, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील चर्च आणि ख्रिश्चन संस्थांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटना पाहता हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. केरळच्या दृष्टीकोनातून पाहिले तर तिथला ख्रिश्चन समुदाय खूप मजबूत आहे. केरळची लोकसंख्या सुमारे 35 दशलक्ष आहे आणि येथील सुमारे 18% मतदार ख्रिश्चन समुदायाचे आहेत. सर्व प्रयत्न करूनही केरळमध्ये भाजपला स्वतःला ठामपणे आपले पाय रोवता आलेले नाही. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपला 10.53 टक्के मते मिळाली होती. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद लावली असतानाही मतांची टक्केवारी फारशी वाढली नाही.
आरएसएसने या दिशेने आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत?
जम्मू-काश्मीर - ख्रिश्चन प्रतिनिधींना निमंत्रित करून मोठी पैज जम्मू-काश्मीरच्या ख्रिश्चन प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. काश्मीरमधील मुस्लीम बहुसंख्य लोकसंख्येचा विचार करता हा आरएसएसचा मोठा राजकीय डाव मानला जात आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 1.25 कोटी लोकसंख्येमध्ये सुमारे 36 हजार ख्रिश्चन आहेत.
केरळ - 18% ख्रिश्चन मतदार भाजपसाठी गेम चेंजर बनू शकतात केरळच्या 3.5 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 18% ख्रिश्चन मतदार आहेत. या राज्यात भाजपचा शिरकाव वाढवण्याचा प्रयत्न आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला येथे 11.3 टक्के मते मिळाली होती. तर 2016 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला 10.53 टक्के मते मिळाली होती.
मेघालय, नागालँड आणि मिझोराम या तीन राज्यांत 70 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या आहे. या राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ईशान्येकडील मंडळींतील भाषणात ख्रिश्चन नेते पोप फ्रान्सिस यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याचा विशेष उल्लेख केला होता.