एक्स्प्लोर

अमित शाह यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लावण्यास संघाचा हिरवा कंदील : सूत्र

अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रीपद किंवा संरक्षणमंत्रिपद देण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अनुकूल असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे देशाचे नवे संरक्षणमंत्री होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शाह यांनी गुजरातमधून राज्यसभेसाठी अर्ज भरला असून केंद्रीय मंत्रिपदाचा त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठीच पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातं. अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रीपद किंवा संरक्षणमंत्रिपद देण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अनुकूल असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अमित शाह यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागावी, अशी आरएसएसचीच इच्छा असल्याची माहिती आहे. त्यांना गृह किंवा संरक्षण मंत्रालय द्यावं, ही देखील संघाचीच भूमिका आहे. मात्र आतापर्यंत संघाची इच्छा काहीही असली, नरेंद्र मोदी यांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घेतले. त्यामुळे आता मोदींची अमित शाह यांच्या बाबतीत काय भूमिका असेल, याबाबत सस्पेंस मात्र कायम आहे. मोदींना कॅबिनेटमध्ये काही वजाबाकी करावी लागणार आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्यात परतल्यानंतर अर्थमंत्री असलेल्या अरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. मात्र देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री असावा, अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच सीमेवर वारंवार उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबतीत योग्य भूमिका घेण्यासाठी अमित शाह यांच्यासारखं नेतृत्व गरजेचं असल्याचं संघात बोललं जात आहे. राज्यमंत्री अनिल दवे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या जागीही कुणाची तरी वर्णी लागणार आहे. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित केलेल्या व्यंकय्या नायडूंकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी स्मृती इराणींकडे देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाहांची वर्णी लागावी, अशी इच्छा संघातील काही कार्यकर्त्यांची आहे. भाजपने केंद्रात सत्ता मिळवल्यानंतर, विविध राज्य देखील काबीज करण्यात अमित शाह यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. त्या कामगिरीचा मोबदला म्हणूनच अमित शाह यांच्या पदरात महत्त्वाचं कॅबिनेट खातं दिलं जाणार जाऊ शकतं. मात्र अमित शाह मंत्री बनल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यासाठी तेवढाच तुल्यबळ चेहरा भाजपला शोधावा लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget