एक्स्प्लोर
नवस पूर्ण झाल्यानं सिद्धीविनायकाच्या चरणी: रॉबर्ट वढेरा

मुंबई: सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी मुंबईत येऊन सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. नवस पूर्ण झाल्याबद्दल दर्शन घेतल्याचं यावेळी वढेरा यांनी सांगितलं. रॉबर्ट वढेरा जवळपास 20 मिनिट सिद्धीविनायकाच्या मंदिरात होते. यावेळी त्यांनी भक्तांना प्रसादाचंही वाटप केलं. तर लोकांसोबत सेल्फीही काढला. रॉबर्ट वढेरा हे प्रियंका गांधींचे पती आहेत. हरियाणामध्ये जमीन घोटाळा करुन करोडोची संपत्ती कमविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
आणखी वाचा























