एक्स्प्लोर
Advertisement
लालूंचा मुलगा शिवअवतारात, हातात त्रिशूळ, डमरु
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा लहान मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव आज शिवरुपात अवतरले
पाटणा: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा लहान मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव आज शिवरुपात अवतरले. उत्तर भारतात श्रावण महिना सुरु झाल्याने शिव पूजेसाठी मंदिरं गजबजली आहेत. बिहारमधील पाटण्यात पूजेसाठी तेजप्रताप यादव थेट शिवरुपातच अवतरले.
शंकराप्रमाणे कमरेवर वाघाच्या कातडीचं कापड, गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ आणि डमरु घेऊन तेजप्रताप शिवभक्त आणि कार्यकर्त्यांसह मंदिरात गेले. तिथे त्यांनी शंखही वाजवला. मंदिरातील पूजेनंतर ते बाबाधामला रवाना झाले.
बिहार-झारखंडमधील अनेक भक्त देवघरच्या बाबा वैद्यनाथ धामला जाऊन शंकरावर जलाभिषेक करतात. तेजप्रताप कावड घेऊन सुल्तानगंजहून 120 किमी पायी देवघर जातील.
तेजप्रताप पहिल्यांदाच त्यांच्या भक्तीमुळे चर्चेत आलेत असं नाही. यापूर्वी त्यांनी श्रीकृष्णाचं रुप धारण केलं होतं.
#WATCH: RJD leader Tej Pratap Yadav dressed up as Lord Shiva offers prayers at a Shiva temple in Patna before leaving for Baba Baidyanath Dham in Deoghar pic.twitter.com/gdBViBmofH
— ANI (@ANI) July 31, 2018
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement