एक्स्प्लोर
लालूंची यंदाची होळी जेलमध्ये, प्रशासनाची खास तयारी!
पण यंदाची होळी लालूंसाठी खऱ्या अर्थाने वेगळी ठरणार आहे. कारण लालू प्रसाद यादव सध्या रांचीच्या बिरसा मुंडा जेलमध्ये कैद आहेत.
![लालूंची यंदाची होळी जेलमध्ये, प्रशासनाची खास तयारी! RJD chief Lalu Prasad Yadav to celebrate holi in Birsa Munda jail लालूंची यंदाची होळी जेलमध्ये, प्रशासनाची खास तयारी!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/23064655/Lalu-Prasad1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची होळी कायमच वेगळी असते. लालू यादव होळी खेळतातच पण स्वत: ढोल वाजवतात आणि होळीची गाणीही गातात. पण यंदाची होळी लालूंसाठी खऱ्या अर्थाने वेगळी ठरणार आहे. कारण लालू प्रसाद यादव सध्या रांचीच्या बिरसा मुंडा जेलमध्ये कैद आहेत. परंतु जेल प्रशासनानेही कैद्यांसाठी होळीची विशेष व्यवस्था केली आहे.
जेल प्रशासनाने एक क्विंटल रंग आणि गुलाल मागवला आहे, असं सांगितलं जात आहे. जर लालूंना वाटलं तर ते या जेलमध्ये होळी गीतंही गाऊ शकतात. लालू प्रसाद यादव अप्पर डिव्हिजन सेलमध्ये बंद आहेत. पण तरीही ते सामान्य कैद्यांसोबतही होळी खेळू शकतात. जेलमध्ये कैद्यांमध्येही होळीबाबत यंदा उत्साहाचं वातावरण आहे. कारण लालू प्रसाद यादव त्यांच्यासोबत आहेत.
*आरजेडीचे कार्यकर्ते होळी साजरी करणार नाहीत!
लालू यादव जेलमध्ये आहेत. रांची हायकोर्टाकडून त्यांना जामीन मिळालेला नाही, त्यामुळे आरजेडी कार्यकर्ते निराश आहेत. लालू जेलमध्ये असल्याने अनेक कार्यकर्ते एवढे दु:खी आहेत की, त्यांनी होळी साजरा न करण्याचं जाहीर केलं आहे. लालू यादव जेलमध्ये सुटल्यानंतरच होळी साजरी करणार असा निश्चय कार्यकर्त्यांनी केला आहे.
*चारा घोटाळ्यात लालूंना 5 वर्षांचा कारावास
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. चारा घोटाळ्यातील तिसऱ्या प्रकरणातही त्यांना दोषी ठरवण्यात आलं. चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवलं आहे.
चारा घोटाळ्यातील हे तिसरं प्रकरण आहे. या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. मिश्रा यांनाही पाच वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर ध्रुव भगतला 3 वर्षांचा सश्रम कारावास आणि 50 हजार रुपये दंड झाला आहे.
चाईबासा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने 56 आरोपींपैकी 50 जणांना दोषी तर सहा जणांना निर्दोष ठरवलं आहे. चाईबासा कोषागार प्रकरणी 12 डिसेंबर 2001 रोजी 76 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
*चारा घोटाळा काय आहे?
चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला.
चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत. यातील एका खटल्यात 2013 साली लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते काही काळ निवडणुकीच्या राजकारणातून दूर झाले.
*1990 मध्ये चारा घोटाळ्याला सुरुवात
चारा घोटाळ्याला 1990 साली सुरुवात झाली होती. त्यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. बिहारचे पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता.
या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत.
*आरोपी कोण आहेत?
चारा घोटाळ्यात एकूण 38 आरोपी होते. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह माजी मुख्यमंत्री जन्नाथ मिश्रा, बिहारचे माजी मंत्री विद्यासगर निषाद, पीएसीचे तत्कालनी अध्यक्ष जगदीश शर्मा आणि ध्रुव भगत, आर. के. राणा, तीन आयएएस अधिकारी, फूलचंद सिंह, बेक ज्युलिएस उर्फ महेश प्रसाद, एस के भट्टाचार्य, पशू चिकित्सक डॉ. के. के. प्रसाद आणि इतर चार आरोपींचा समावेश होता.
*चारा घोटाळा : लालूंसह 15 जण दोषी, तर 7 जण निर्दोष
यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला. तिघेजण सीबीआयचे साक्षीदार बनले आणि आपला गुन्हा मान्य केला होता. त्यानंतर त्या तिघांनाही 2006-07 मध्ये शिक्षा सुनावली गेली. त्यामुळे आता एकूण 22 आरोपींविरोधात रांची कोर्टात निर्णय दिला जाणार आहे.
*चारा घोटाळ्याचा घटनाक्रम
चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे.
900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला. या घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा मुख्य आरोपी बनवलं गेलं.
10 मे 1997 रोजी सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे मागणी केली की, लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई व्हावी.
23 जून 1997 रोजी लालूप्रसाद यादव आणि इतर 55 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
29 जुलै 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांना अटक करण्यात आली होती.
12 डिसेंबर 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांची सुटका झाली.
28 ऑक्टोबर 1998 रोजी पुन्हा अटक करण्यात आली.
मार्च 2012 रोजी सीबीआयने पाटणा कोर्टात लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 32 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
2013 मध्ये चारा घोटाळ्याशी संबंधित चाईंबासा प्रकरणात त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
संबंधित बातम्या
चारा घोटाळा नेमका काय आहे?
चारा घोटाळा : लालूंना साडेतीन वर्षांचा कारावास
चारा घोटाळा : लालूंसह 15 जण दोषी, तर 7 जण निर्दोष
चारा घोटाळा : चाईबासा प्रकरणात लालूंना 5 वर्षांचा कारावासअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)