एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : 'सैन्य भरती थांबवून आपल्या सैन्याचा आकार 1 लाख 80 हजारांनी कमी केला, ही कोणाची बुद्धिमानी आयडिया'? माजी मेजर जनरलचा 'अग्नि' भडकला

Pahalgam Terror Attack : गोळीबारानंतर दहशतवादी पळून गेले. पहलगाम हल्ल्यात दोन परदेशी दहशतवादी आणि दोन स्थानिक दहशतवादी सहभागी असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.

Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजता झालेल्या या हल्ल्यात 20 हून अधिक लोक जखमी झाले. लष्कर-ए-तैयबाची शाखा द रेझिस्टंट फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गोळीबारानंतर दहशतवादी पळून गेले. पहलगाम हल्ल्यात दोन परदेशी दहशतवादी आणि दोन स्थानिक दहशतवादी सहभागी असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.

दहशतवाद्यांनी त्यांची नावे विचारली आणि त्यांना कलमा म्हणायला लावला 

असे म्हटले जात आहे की पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांची नावे विचारली आणि त्यांना कलमा म्हणायला लावला. त्यापैकी एक उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदी होता, ज्याला त्याचे नाव विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी डोक्यात गोळी मारली. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून भारतात परतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला पोहोचले. तो आज पहलगामला जाईल. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. अमेरिका, इराण, रशिया, इटली, युएई आणि इतर देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने याची जबाबदारी घेतली होती.

सैन्याचा आकार 1 लाख 80 हजारांनी कमी केला, ही कोणाची बुद्धिमानी आयडिया?

दरम्यान, बैसरन व्हॅलीमध्ये दोन हजारांवर पर्यटक जमले होते. या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी  एकही पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणांचा कर्मचारी उपस्थित नव्हता, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर माजी मेजर जनरल जीडी बक्षी (retired Major General GD Bakshi) यांनी सैन्य कपातीवर घणाघाती हल्ला चढवला आहे.  भारतीय लष्करात सैन्य भरती रोखून लष्कराचा आकार 1 लाख 80 हजारांनी कमी केला. कोणाची ही बुद्धिमानी आयडिया होती? अशी विचारणा त्यांनी इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला. तुम्ही म्हणता पैसा वाचवू कारण अशी पद्धतीने लोक मारले जावेत? पर्वतीय प्रदेशात, जंगलामध्ये लढण्यास सेना हवीच, असे ते म्हणाले. 

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू

दरम्यान,  जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. संतोष जगदाळे यांच्या डोक्यात, कानात आणि पाठीत गोळ्या लागल्या. तर कौस्तुभ गणबोटे यांच्या पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. जगदाळे त्यांच्या कुटुंबासह पहलगामला भेट देण्यासाठी आले होते. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगीही होती. तिथे एक महिला नातेवाईकही होती. दहशतवाद्यांनी तिन्ही महिलांना सोडले.

जगदाळे यांच्या मुलीने सांगितले की, दहशतवाद्यांनी त्यांच्या वडिलांना कलमा म्हणण्यास सांगितले होते आणि जेव्हा ते तसे करू शकले नाहीत तेव्हा त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हातात बंदुका घेऊन, दहशतवादी तंबूत लपलेल्या लोकांना शोधत होते आणि मारत होते.

प्रत्यक्षदर्शी मुलगी म्हणाली, माझ्यासमोर वडिलांना गोळ्या घातल्या 

मुलगी आसावरी जगदाळे यांनी फोनवरून पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही पाच जणांचा गट होतो. ज्यामध्ये माझे पालकही होते. आम्ही पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये होतो तेव्हा आम्हाला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पोलिसांच्या गणवेशात असलेले काही लोक गोळ्या झाडत असल्याचे पाहिले. आसावरी म्हणाली, "आम्ही सर्वजण जवळच्या तंबूत लपलो. इतर 6-7 जणही आले. गोळीबार टाळण्यासाठी आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो, सुरुवातीला आम्हाला वाटले की ही अतिरेकी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमधील चकमक आहे."

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
Yavatmal News: यापैकी उच्च जात कोणती? शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नाने संताप, संस्थेवर कारवाईची मागणी
यापैकी उच्च जात कोणती? शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नाने संताप, संस्थेवर कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
Yavatmal News: यापैकी उच्च जात कोणती? शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नाने संताप, संस्थेवर कारवाईची मागणी
यापैकी उच्च जात कोणती? शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नाने संताप, संस्थेवर कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
Leopard attack Government job: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
Bhaskar Jadhav: नागपूरच्या हॉटेलमध्ये भास्कर जाधव शिंदे गटाच्या नेत्याला भेटले, VIDEO व्हायरल, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना उधाण
नागपूरच्या हॉटेलमध्ये भास्कर जाधव शिंदे गटाच्या नेत्याला भेटले, VIDEO व्हायरल, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना उधाण
Embed widget