Pahalgam Terror Attack LIVE: पहलगाल हल्ल्यात जीव गमावलेल्या संतोष जगदाळे अन् गणबोटे यांचं पार्थिव पुण्यात दाखल
Pahalgam terror attack: भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 28 जण मृत्युमुखी पडले आहेत.

Background
भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 26 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये डोंबिवलीतील तिघांचा समावेश आहे.
श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे.
पाणीटंचाईच्या झळा! लातूरच्या 13 गाव, 5 वाड्यांमध्ये टँकरपुरवठा सुरु
पाणीटंचाईच्या झळा... लातूर जिल्ह्यातील १३ गावं आणि ५ वाड्यांना २१ अधिग्रहणांद्वारे तर दोन तांड्यांना एका टँकरद्वारे सध्या सुरू आहे पाणीपुरवठा
A/c : लातूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. वाढत्या उन्हाबरोबरच जिल्ह्यातील काही भागात पाणीटंचाईच्या झळा ही तीव्र होत चालल्या आहेत. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने सध्या लातूर जिल्ह्यातील १३ गावे आणि ५ वाड्यांना विहीर आणि बोअरच्या अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा आणि वाघमारी तांडा या तांड्यांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, अशी माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. उन्हाच्या तीव्रतेमुळे खालावत असलेली पाणीपातळी लक्षात घेता येत्या महिन्यात जिल्ह्यात अधिग्रहणांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हे मनमोहन सिंगांचं सरकार नाही, पहलगाम हल्ल्यानंतर नितेश राणे म्हणाले...
सिंधुदुर्ग
नितेश राणे पत्रकार परिषद मुद्दे
ऑन जम्मू काश्मीर
२०१४ नंतर आतंकवाद असो किंवा पाकिस्तान देशाची प्रतिमा कणखर राहिलेली आहे. हे काय मनमोहन सिंग यांचं सरकार नाही. गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही मोदीजींचं केंद्र सरकार आहे. २०१४ च्या नंतर आपल्या देशाकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलेला आहे.. पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा अबा पण वाकड्या नजरेने बघणार नाही
ऑन पुलवामा
मोदी वर विश्वास ठेवला पाहिजे. मनमोहन सिंग आणि लीचे पीचे काँग्रेस वाल्यांचे सरकार नाही. हे कणखर देशभक्ताचं राष्ट्रभक्ताचं सरकार आहे. त्यामुळे पाकिस्तान परत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करणार नाही.
ऑन संजय राऊत
शेंबड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न विचारता भांडुपच्या देवानंदला देशपातळीचे प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारल्यावर अशीच उत्तर मिळणार त्याचा मालक. ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता त्यावेळी कोरोना काळात महाराष्ट्र एक नंबरला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता का. त्यामुळे कुठल्या तोंडाने अमित शहा यांचा राजीनामा मागतोय.
ऑन चिपी विमानतळ
संदर्भात बॅरिस्टर नाथ पै विमानतळाच्या नावा संदर्भात केंद्र शासनाकडे गेलेला आहे. आता तो अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री कार्यालय स्वतः याचा पाठपुरावा करत आहेत. विमानतळावर नाईट लँडिंग व्हावी यासाठी खासदार नारायण राणे यांनी मी एका महिन्यात तीन बैठका घेतल्या आहेत. आनंदाची बातमी अशी की त्या दिशेने वाटचाल देखील सुरू आहे. नाईट लँडिंग साठी लागणारी वीज सुविधा आहे. त्या सुविधेला जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिला आहे.
ऑन मच्छीमार व्यावसायिकांना कृषी दर्जा
चार लाख ८३ हजार मच्छीमारांचा बांधवांचा दरडोई उत्पन्न वाढावं हे आमचे धोरण आहे. मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देण्यात यावा हा निर्णय घेणारा महाराष्ट्र पहिले राज्य आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना सवलती मिळत आहेत. त्या सवलती आता मच्छीमार बांधवांना मिळणार देशामध्ये मासेमारीमध्ये महाराष्ट्र पहिल्या तीन क्रमांका मध्ये येईल.
ऑन एकनाथ शिंदे;वैभव नाईक ऑफर संदर्भात
तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या दुकानात कुठला माल भरावा हा त्यांचा प्रश्न आहे आहे. उदय सामंत यांनी कोणाला ऑफर द्यावं कोणाला नाही द्यावं हा त्यांचा विषय आहे. त्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचे स्वागत करतो. शिवसेना व भाजप हे एकत्र निवडणूक लढवून जिंकून आलो आहे. त्यामुळे हा कोणा एकाचा बालेकिल्ला होऊ शकत नाही. सिंधुदुर्ग हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या विजयामध्ये भाजपचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा आहे.























