एक्स्प्लोर

महागाई दरात घसरण, तर औद्योगिक उत्पादन दरात वाढ

महागाई दर घसरुन 4.4 टक्क्यांवर आला आहे, तर औद्योगिक उत्पादन दर 7.5 टक्क्यांवर गेला आहे. मात्र असं असलं तरी व्याजदरात कपात होण्याची चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत.

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खुशखबर आहे. महागाई दर घसरुन 4.4 टक्क्यांवर आला आहे, तर औद्योगिक उत्पादन दर 7.5 टक्क्यांवर गेला आहे. मात्र असं असलं तरी व्याजदरात कपात होण्याची चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत. महागाई दर सांख्यिकी मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात महागाई दर 4.44 टक्के होता, तर जानेवारी महिन्यात हाच दर 5.07 टक्के होता. मात्र यापुढे महागाई दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदर कपात करण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. पुढच्या महिन्यात रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर होईल. महागाई दर हाच पतधोरण व्याजदराच्या समीक्षेचा प्रमुख आधार असतो. सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील करारानुसार, महागाई दर 4 (+/-2) टक्क्यांपर्यंत ठेवण्याचं लक्ष्य आहे. म्हणजेच महागाई दराची किमान मर्यादा दोन टक्के आणि कमाल मर्यादा सहा टक्के आहे. हा दर कायम चार टक्क्यांच्या आसपास राहिला तर व्याजदरात कपात केली जात नाही. शिवाय हा दर सतत पाच टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल नसेल, तर हे व्याजदरात वाढ होण्याचे संकेत असतात. फळ आणि भाजीपाल्याच्या दरात वाढ न होणं हे जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये महागाई दर कमी होण्यामागचं कारण आहे. फेब्रुवारीमध्ये भाज्यांचा महागाई दर 17.5 टक्के होता, तर अंड्यांचा साडे आठ टक्के आणि दुधाचा जवळपास पावणे चार टक्के होता. जानेवारीपर्यंत हा दर जास्त होता, ज्यामुळे महागाई दर सतत पाच टक्क्यांवर राहिला. दरम्यान, पुढे महागाई दरात वाढ होण्याची शक्यता आहे. औद्योगिक उत्पादन दर जानेवारीमध्ये औद्योगिक उत्पादन दर 7.5 टक्के, तर डिसेंबरमध्ये 7.1 टक्के होता. विशेष म्हणजे 23 पैकी 16 औद्योगिक समुहांच्या उत्पादन वाढीचा दर सकारात्मक होता. सर्वात जास्त वाढ वाहतूक उपकरणं बनवणाऱ्या उद्योगांमध्ये दिसून आली, तर तंबाखूजन्य पदार्थांचं उत्पादन करणाऱ्या उद्योगांच्या उत्पादन दरात कमालीची घसरण झाली. दिलासादायक बाब म्हणजे, उत्पादन क्षेत्राची कामगिरी गेल्या अनेक दिवसांपासून चांगली आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास दर जानेवारीमध्ये 8.48 टक्के होता, तर तो 8.7 टक्के नोंदवण्यात आला. याचाच अर्थ उद्योग क्षेत्र नोटाबंदी आणि जीएसटीच्या परिणामांपासून सावरत असल्याचं दिसत आहे. शिवाय रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget