एक्स्प्लोर
जीएसटी लागू होण्यापूर्वी आज मध्यरात्री हॉटेल बंद राहणार!

मुंबई : हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा प्लॅन आखत असाल तर तुम्हाला मध्यरात्रीच्या आधीच आटोपता घ्यावा लागणार आहे. कारण शनिवार, 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने आज (30 जून) रात्री साडेअकरापासून रात्रभर मुंबईतील हॉटेल बंद असतील.
एरव्ही बरेचसे रेस्टॉरंट रात्री 1.30 वाजता बंद होतात. पण शुक्रवार, जरी तो धंद्याचा दिवस असला तरी रेस्टॉरंट रात्री 11.30 वाजता बंद होणार आहे किंवा मध्यरात्रीपर्यंतच ऑर्डर स्वीकारल्या जातील.
शनिवारी सकाळी सर्व रेस्टॉरंटमध्ये जीएसटीनुसार दर आकारले जाणार आहेत.
काही तांत्रिक अडचणी आहेत. जीएसटी सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी सिस्टम रिबूट केल्या जाणार आहेत. हे सॉफ्टवेअर योग्य प्रकारे लागू व्हावं, यासाठी शुक्रवारी 12 वाजण्याआधी हॉटेल बंद करावं लागेल, असं मुंबईतील एका रेस्टॉरंट मॅनेजरने सांगितलं.
जर एखाद्या ग्राहकाने रात्री 12 पूर्वी ऑर्डर केली, तर त्याचं बिल सध्याच्या दराप्रमाणेच आकारलं जाईल. पण त्याच ग्राहकांनी 12 नंतर ऑर्डर दिली तर तो जीएसटीच्या कक्षेत येईल. त्यामुळे अशा अडचणीपासून वाचण्यासाठी रेस्टॉरंट मालकांनी रात्री 11.30 वाजता हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, जीएसटी लागू झाल्यानंतर हॉटेलमधील खाणं महाग होणार आहे.
30 जूनला मध्यरात्री राजधानी दिल्लीत जीएसटीचं अधिकृतरित्या लॉन्चिंग होणार आहे. यानंतर 1 जुलै रोजी एका विशेष कार्यक्रमात जीएसटी लागू झाल्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























