Republic Day 2024 : यंदाचा प्रजासत्ताक दिन 75 वा की 76 वा? तुमचाही गोंधळ होतोय? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वाचा एका क्लिकवर...
Republic Day 2024 : ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तब्बल 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. यानंतर
Republic Day 2024 : 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तब्बल 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. यानंतर 1950 मध्ये भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून 'प्रजासत्ताक दिन' (Republic Day) साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान समितीने संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आणले गेले. पण, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही अनेकांना प्रश्न पडतो की यंदाचा प्रजासत्ताक दिन हा 75 वा आहे की 76 वा आहे? तुमचा हाच गैरसमज या ठिकाणी आपण दूर करणार आहोत.
यंदा भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन?
यावर्षी स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून तो पहिला प्रजासत्ताक दिन होता. तांत्रिकदृष्ट्या हा दिवस 26 जानेवारी 1950 रोजी देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन होता. यानंतर, 26 जानेवारी 1951 हा भारताचा दुसरा प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताकाचा पहिला वर्धापन दिन असेल.
26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन का?
26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. देशाचे राष्ट्रपती या कार्यक्रमात सहभागी होतात आणि या दिवशी ध्वजारोहण करतात. यानंतर, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हापासून हा सण देशात साजरा केला जातो. हा तो दिवस आहे जेव्हा भारताने आपल्या देशाच्या आणि नागरिकांच्या हितासाठी संविधान (नियम) मुक्तपणे पारित केले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याला बनवण्यासाठी तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. यानंतर, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.