एक्स्प्लोर
'एनीडेस्क' अॅप अनइन्स्टॉल करा, रिझर्व्ह बँकेचे निर्देश
सायबर गुन्हेगारांनी लोकांच्या बँक खात्यामधील पैसे चोरी करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. सायबर चोरांनी बँकांचे खोटे अॅप्स तयार केले आहेत.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक अलर्ट जारी केला आहे. आरबीआयने म्हटलं आहे की, कोणतीही व्यक्ती एनीडेस्क (AnyDesk) अॅप वापरत असेल, मोबाईल किंवा लॅपटॉमध्ये ते इन्स्टॉल केलं असेल, तर त्याने ते त्वरित अनइन्स्टॉल करावं. सायबर चोर आता या अॅपच्या माध्यमातून लोकांच्या बँक खात्यातील पैसे लंपास करत आहेत.
सायबर गुन्हेगारांनी लोकांच्या बँक खात्यामधील पैसे चोरी करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. सायबर चोरांनी बँकांचे खोटे अॅप्स तयार केले आहेत. या अॅप्सची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरातदेखील केली जाते. हे अॅप जो कोणी इन्स्टॉल करुन त्यामध्ये स्वतःच्या बँक खात्यासंदर्भातील माहिती भरेल, त्याच्या खात्यातले सर्व पैसे हे सायबर चोर लुटत आहेत. अशा प्रकारच्या काही घटना समोर आल्याने आरबीआयने अलर्ट जारी केला आहे.
VIDEO
अशा प्रकारे चोरी केली जाते
सोशल मीडियाद्वारे या अॅप्सची जाहिरात केली जाते. अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजरला एक नऊ अंकी कोड मिळतो. जेव्हा तो कोड आपण अॅपमध्ये रजिस्टर करुन, तेव्हा मोबाईल या अॅपची परवानगी मागतो. परवानगी दिल्यानंतर या सायबर चोरांना आपल्या बँक खात्यासंबधीचा रिमोट अॅक्सेस मिळतो. त्याद्वारे हे चोर बँक खात्यातले पैसे लुटतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement