एक्स्प्लोर
Advertisement
बँकांमध्ये मुस्लिमांना विशेष सवलती देण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार
मुंबई : देशातल्या मुस्लिम समाजाला बँकिंग व्यवहाराकडे आकर्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नवा प्रस्ताव समोर आणला आहे. यानुसार देशातल्या प्रत्येक बँकांमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवहारांसाठी विशेष सवलती दिल्या जाणार आहेत.
बँकेतल्या व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मुस्लिम समाजाला स्वतंत्र खिडकीची योजना आणण्याचा विचार रिझर्व्ह बँक करत आहे. विशेष म्हणजे व्याजमुक्त व्यवहारांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. सरकारकडून योग्य त्या अधिसूचना जारी केल्यानंतर सध्याच्या पारंपरिक बँकांमध्ये इस्लामिक विंडो टप्प्याटप्प्याने सुरु केली जाऊ शकते.
काही वर्षांपासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक देशात इस्लामिक बँकिंग सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्या व्यक्ती अद्याप धार्मिक कारणांस्तव सर्वसमावेशकतेपासून दूर आहेत, त्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी हा उपाय अंमलात आणण्याचा विचार आहे.
इस्लामी धर्म ग्रंथ कुराणमध्ये व्याज घेणं हराम मानलं जातं. त्यामुळे देशातला मुस्लिम समाज आजही बँकिंग व्यवहारापासून दूर आहे. त्याच समाजाला बँकेत आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
निवडणूक
Advertisement