एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रिझर्व बँकेने दोन बँकांना ठोठावला पाच कोटींचा दंड
अॅक्सिस बँकेला तीन कोटी, तर इंडियन ओवरसिस बँकेला दोन कोटी रुपये भरण्याचे आदेश रिझर्व बँकेने दिले आहेत.
नवी दिल्ली : रिझर्व बँकेने देशातल्या दोन मोठ्या बँकांना पाच कोटीचा दंड ठोठावला आहे. यात अॅक्सिस बँकेला तीन कोटी, तर इंडियन ओवरसिस बँकेला दोन कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.
रिझर्व बँकेने अॅक्सिस बँकेवर एनपीएसंदर्भातील कायद्याचे उल्लंघनाचा ठपका ठेवला आहे. तर इंडियन ओवरसिस बँकेवर केवायसीसंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयने 31 मार्च 2016 रोजी अँक्सिस बँकेचं ऑडिट केलं. या ऑडिट रिपोर्टच्या आधारेच बँकेने अॅक्सिस बँकेला दंड ठोठावला आहे. अंतरिम ऑडिटमध्ये एनपीएची मर्यादा निश्चित करण्यासंदर्भात काही नियमावली आहे. पण त्याचे उल्लंघन केल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व बँकेने स्पष्ट केले.
तर इंडियन ओवरसिस बँकेच्या एका शाखेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. बँकेच्या अंतरिम ऑडिटमध्ये बँकेने केवायसीचे नियम पूर्ण केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ओवरसिस बँकेला दोन कोटीचा दंड ठोठवण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement