एक्स्प्लोर
व्हायरल सत्य : अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द होणार?
मुंबई : नोटाबंदीच्या काळात पैशांची मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्यामुळे अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द केला जाणार आहे, असा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. त्यावर आता रिझर्व बँक ऑफ इंडियानेच स्पष्टीकरण दिलं आहे.
दिल्लीतील अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये बेकायदेशीरपणे जुन्या नोटा घेऊन नव्या नोटा बदलून दिल्याचं समोर आलं होतं. यानंतर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने अॅक्सिस बँकेच्या काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यातही घेतलं आहे.
काय आहे आरबीआयचं स्पष्टीकरण?
500 आणि 1000 च्या जुन्या नोटांच्या बदल्यात अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमधून बेकायदेशीरपणे पैसे बदलून देण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द होणार आहे, सर्व खातेधारकांनी आपले पैसे तात्काळ काढून घ्यावे, असा मेसेज व्हायरल होत आहे.
मात्र आरबीआयने ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द करण्याबाबत कसलीही कारवाई सुरु केली नसल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.
अॅक्सिस बँकेचं बेकायदेशीर नोटाबदली प्रकरण
मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत ईडीने एक्सिस बँकेच्या दोन व्यवस्थापकांना अटक केली आहे. दोघेही दिल्लीच्या आयएसबीटी काश्मीरी ब्रांचमध्ये कार्यरत होते.
दोघांनी जवळपास 40 कोटी रुपये एवढा काळा पैसा पांढरा केल्याची माहिती आहे. सोबत तीन किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे. दोघांकडून बेकायदेशीररित्या होणारा 11 खात्यांचा गैरव्यवहार थांबवण्यात ईडीला यश आलं आहे.
अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापनाने देखील या प्रकरणात ईडीला चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. शिवाय तब्बल 19 कर्मचाऱ्यांना निलंबितही केलं.
संबंधित बातम्या :
तब्बल 40 कोटींचा गैरव्यवहार, एक्सिस बँकेच्या दोन व्यवस्थापकांना अटक
अवैध नोटाबदलीप्रकरण, एक्सिस बँकेच्या तब्बल 19 कर्मचाऱ्यांचं निलंबन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement