एक्स्प्लोर

RSS On Hindu Rashtra : भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करणार? संघाचे सरकार्यवाह होसबळे यांनी स्पष्टच सांगितले

RSS Hindu Rashtra : हिंदू राष्ट्राच्या मुद्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भुज, गुजरात :  केंद्रात सरकार आल्यानंतर भाजपकडून (BJP) आक्रमकपणे हिंदुत्ववादी (Hindutva) भूमिका घेणे सुरू झाले. मागील काही वर्षात संघ परिवारातील काही संघटना, भाजपचे काही नेते आणि इतर उजव्या संघटनांकडून हिंदू राष्ट्राची (Hindu Rashtra) मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे (Dattatreya Hosabale) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता नाही. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक गुजरातमधील भूजमध्ये पार पडली. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता नाही. भारत हिंदू राष्ट्र आहेच असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केले आहे. भारत हिंदू राष्ट्र केव्हा बनणार या पत्रकारांच्या प्रश्नाचा उत्तर देताना होसबळे यांनी भारत हिंदू राष्ट्र आधीही होता, आजही आहे आणि नेहमीच राहणार असे मत व्यक्त केले. 

यावेळी होसबळे यांनी आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार यांच्या एका ऐतिहासिक वक्तव्याचा उदाहरणही दिले. हेडगेवार म्हणाले होते मी हिंदू आहे असे म्हणणारा एकही व्यक्ती जोवर या भूमीवर आहे, तोवर भारत हिंदू राष्ट्र राहणार.

यावेळी आपल्या उत्तरात आणखी स्पष्टता आणण्यासाठी होसबळे यांनी संविधानानुसार असलेली राज्यपद्धती म्हणजेच स्टेट सिस्टम आणि राष्ट्र ( नेशन ) यांच्यामध्ये काय फरक आहे, हेही खुलासेवार सांगितले. भारतावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते, तेव्हा ते ब्रिटिश राज होते. मात्र तेव्हाही राष्ट्र म्हणून भारत हिंदू राष्ट्रच होता असे होसबळे म्हणाले. आपला देश, समाज, संस्कृती, धर्म यासाठी काहीतरी चांगलं करण्याची भावना असणे हेच हिंदुत्व आहे आणि याच हिंदुत्वाची जाणीव व्हावी यासाठी संघ कार्य करत आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची गरज नसून भारत हिंदू राष्ट्रच आहे असा पुनरुच्चार होसबळे यांनी केला.

हिंदुस्थान हिंदू राष्ट्र, हे सत्य आहे आणि आरएसएस हे करणार : सरसंघचालक

हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे,आणि हे सत्य आहे आणि आरएसएस हे करणार. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत, काही लोकांना समजले आहे आणि काही लोक समजल्यानंतरही अनभिज्ञ आहेत," असं वक्तव्य सप्टेंबर महिन्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. "हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, हे सत्य आहे, आरएसएस हे नक्की करेल, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे, यात काही आक्षेप नाही पण सर्व भारतीयांची काळजी करा, वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत," असं भागवत यांनी त्यावेळी म्हटले. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलंMumbai Speed Boat  : रेस्क्यू ऑपरेशन संपलं,  तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरुMumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Embed widget