एक्स्प्लोर
गुंगीचं औषध देऊन व्यापारी महिलेवर बलात्कार, आरोपी फरार
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये एका बिझनेस वुमनसोबत लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील कनॉट
प्लेस परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळच्या दरम्यान या घटनेची माहिती मिळाली.
दक्षिण दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका 33 वर्षीय व्यापारी महिलेने आरोप केला आहे. महिला शुक्रवारी चंदीगडला राहणाऱ्या बिझनेसमनकडे मीटिंगसाठी कॅनॉट प्लेसमध्ये आली होती. लंचच्या वेळेस दोघांची मुलाखत झाली. त्याचेवेळेस आपल्याला त्या व्यक्तीनं कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध दिलं. ज्यामुळे ती महिला बेशुद्ध झाली.
त्यानंतर आरोपीनं हॉटेलच्या रुममध्ये जाऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिथून फरारही झाला. जेव्हा महिलेला शुद्ध आली त्यावेळी तिनं याबाबत पोलिसांना याबाबत माहिती दिली. आपण त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असून याआधी बिझनेसनिमित्त आपण त्याला चंदीगडमध्येही भेटलो होतो.
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपीचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement