(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Mandir Pran Pratistha : अडवाणींची सोहळ्याला दांडी, पीएम मोदी अयोध्येत, अमित शाह दिल्लीत, अन् राहुल गांधी जप करणार!
काँग्रेस नेते राहुल गांधी आसाममधील नागाव येथील संत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी पूजा करणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता येथील काली मंदिराला भेट देणार आहेत.
Ram Mandir Pran Pratistha : अयोध्येतील भव्य राम मंदिराचा अभिषेक आज सोमवारी म्हणजेच आज (22 जानेवारी) होत आहे. ठिकठिकाणी लोकांनी आपल्या घरांवर आणि दुकानांवर भगवान श्रीरामाचे झेंडे लावले आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून ते काँग्रेस नेते राहुल गांधींपर्यंत सर्वजण देशातील विविध मंदिरांमध्ये पूजा करणार आहेत. अभिषेकासाठी देशभरातील मंदिरे दिवे आणि फुलांनी सजवण्यात आली आहेत. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राम मंदिर अभिषेक सोहळ्यासाठी (Ram Pran Pratishtha Ceremony) उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीतील वाढलेली थंडी आणि खराब हवामान यामुळे त्यांनी सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
गृहमंत्री अमित शहा प्राणप्रतिष्ठानिमित्त दिल्लीतील बिर्ला मंदिरात पूजा करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिल्लीतील झंडेवालान मंदिरात प्रार्थना करणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव ओरछा येथे पूजा करणार आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्षांचे नेतेही देशातील विविध मंदिरांमध्ये पूजा करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आसाममधील नागाव येथील संत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी पूजा करणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता येथील काली मंदिराला भेट देणार आहेत.
अरविंद केजरीवाल दिल्लीत पूजा करणार
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मंदिरात पूजा करणार आहेत. याशिवाय सुंदरकांड, शोभा यात्रा, भंडाराही निघणार आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रणही उद्धव यांना मिळाले होते. अन्य विरोधी पक्षांचे नेतेही पूजा करण्यासाठी मंदिरांमध्ये पोहोचणार आहेत.
राम मंदिर भारतीय वारसा समृद्ध करेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले आहे. राम मंदिरामुळे भारतीय वारसा आणि संस्कृती समृद्ध होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पीएम मोदी म्हणाले की, राम मंदिर देशाच्या विकासाचा प्रवास नव्या उंचीवर नेणार आहे. वास्तविक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीएम मोदींना पत्र लिहिले होते, ज्याच्या उत्तरात पंतप्रधानांनी या गोष्टी सांगितल्या आहेत.
राष्ट्रपती मुर्मू यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रभू राम जन्मस्थानी बांधलेल्या नवीन मंदिरात भगवान श्रीरामाच्या मूर्तीच्या अभिषेकासाठी जाण्यासाठी तुम्ही स्वत:ला तयार केले आहे. मी फक्त त्या अनोख्या सभ्यतेच्या प्रवासाची कल्पना करू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या