(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा
Rajya Sabha Elections : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेनं दावा केला आहे.
Rajya Sabha Elections : महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे पी. चिदंबरम यांची मुदत संपत आहे. तर भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेनं दावा केला असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीकडे सहापैकी चार जागा जिंकून येऊन शकतात एवढी मतं आहेत. मात्र महाविकास आघाडी शिवसेनेला मदत करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.
राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते. यामुळं राज्यसभेच्या महाराष्ट्रातील या सहा जागांच्या निवडणुकीत चुरस असणार आहे.
सहा जागांसाठी 31 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत
राज्यसभेचे सदस्य असलेल्या महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे पी. चिदंबरम यांची मुदत संपत आहे. तर भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. आता या सहा जागांसाठी 31 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून निवडणूक लागली तर 10 जून रोजी मतदान होईल. राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता आहे. तर पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांचंही पुन्हा येणं निश्चित आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 19 जागा आहेत. यात भाजपचे सात, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचे तीन, काँग्रेसचे तीन, रिपाई(आठवले गट) एक आणि एका अपक्ष खासदाराचा समावेश आहे.
अन्य काही महत्वाच्या बातम्या
Rajya Sabha Elections : महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर, 10 जून रोजी होणार मतदान
Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजेंचं ठरलं! राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार