एक्स्प्लोर

Rajya Sabha Elections :  महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर, 10 जून रोजी होणार मतदान

Rajya Sabha : जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी आकड्यांच्या दृष्टीने राज्य सभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे.

Rajya Sabha Elections :  महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे पी. चिदंबरम यांची मुदत संपत आहे. तर भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे.  31 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून निवडणूक लागली तर 10 जून रोजी मतदान होईल. 

राज्यसभेसाठी पंधरा राज्यातील 57 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी आकड्यांच्या दृष्टीने राज्य सभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीने राज्यसभेतील बरीच गणितं बदलणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या सहा खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता आहे. तर पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांचंही पुन्हा येणं निश्चित आहे. महाराष्ट्रातील भाजपचे तीन खासदार निवृत्त होत आहेत. परंतु, महाविकास आघाडीची विधानसभेतली ताकद एकत्र राहिली तर भाजपचे दोनच खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात. तिसऱ्या जागेसाठी काही मतं कमी पडत आहेत. त्यामुळे या सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण होऊ शकते. 

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 19 जागा आहेत. यात भाजपचे सात,  राष्ट्रवादीचे चार,  शिवसेनेचे तीन,  काँग्रेसचे तीन,  रिपाई(आठावले गट) एक आणि एका अपक्ष  खासदाराचा समावेश आहे. 

संभाजीराजे लढवणार अपक्ष निवडणूक 

राज्यसभेची आजच निवडणूक जाहीर झाली आहे आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आज राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचे जाहीर केले आहेत. सध्याच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, शिवसेनेचा एक आणि काँग्रेसचा एक खासदार निवडून येऊ शकतो. सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावेदारी सांगितली आहे. ही निवडणूक लढण्यासाठी अनुमोदक म्हणून दहा आमदारांची आवश्यकता असते. त्यामुळे हे दहा आमदार संभाजी राजे यांना मिळणार का हे पाहावे लागणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : 'स्वराज्य' संघटना अन् राज्यसभेची अपक्ष निवडणूक, संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्वाचे मुद्दे 

Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजेंचं ठरलं! राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget