एक्स्प्लोर
Advertisement
माझं भगवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे : सुपरस्टार रजनीकांत यांचा आरोप
तमिळ चित्रपटसृष्टीतले अभिनेते सुपरस्टार रजनीकांत हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या सर्व बातम्या आणि भाजप प्रवेशाच्या सर्व शक्यता रजनीकांत यांनी आज फेटाळल्या आहेत.
चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार रजनीकांत हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या सर्व बातम्या आणि भाजप प्रवेशाच्या सर्व शक्यता रजनीकांत यांनी फेटाळल्या आहेत. रजनीकांत म्हणाले की, "भाजपने मला त्यांच्या पक्षात येण्याचं आमंत्रण दिलेलं नाही. परंतु काही माध्यमं आणि ठराविक लोक माझं भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत."
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने जाहीर केले आहे की, आमच्या पक्षाने कधीही असा दावा केलेला नाही की, रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पोन राधाकृष्णन आणि रजनीकांत यांची नुकतीच भेट झाली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या पसरू लागल्या. परंतु मला भाजपकडून पक्षात येण्यांचं कोणतंही आमंत्रण नाही, असे रजनीकांत यांनी आज स्पष्ट केले.
रजनीकांत म्हणाले की, मला भाजपच्या रंगात, भगव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिरुवल्लुवर यांचेदेखील भगवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु तिरुवल्लुवरजी त्यामध्ये फसले नाहीत, त्याचप्रमाणे मीदेखील यात अडकणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement