Viral News : 'बुलाती है मगर जाने का नही...', 31 डिसेंबरच्या धर्तीवर पोलिसांची अनोखी सूचना
Viral News Rajasthan : राजस्थान पोलिसांनी ट्वीटच्या माध्यमातून 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करताना दारू पिऊन गाडी चालवू नका असा संदेश दिला आहे.
मुंबई : आतापर्यंत मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या ट्वीट्सच्या माध्यमातून अनेकदा भन्नाट संदेश दिले आहेत. त्या ट्वीट्सची चांगलीच चर्चा झाली. पण असा संदेश देण्यामध्ये आपणही काही कमी नसल्याचं राजस्थान पोलिसांनी सिद्ध केलं आहे. राजस्थान पोलिसांनी 31 डिसेंबरच्या धर्तीवर दारू पिऊन गाडी चालवू नका असा संदेश त्यांच्या वेगवेगळ्या ट्वीट्सच्या माध्यमातून दिला आहे. 'बुलाती है मगर जाने का नही...पीकर गाडी चलाने का नही' असं राजस्थान पोलिसांनी एक ट्वीट केलं आहे.
देशभरात नववर्षाच्या जल्लोषाची तयारी चांगलीच सुरु आहे. विशेषत: तरुणाईमध्ये संपणाऱ्या वर्षाला गुड बाय करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळे प्लॅन्स केले जात आहेत. यातील सर्वात लोकप्रिय प्लॅन म्हणजे दारू पिऊन जल्लोष करणे होय. मग या दिवशी अनेकजण दारू पितात आणि गाडी चालवतात. मग त्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. प्रसंगी जीवही जातात. यासाठी देशभरातील पोलीस त्या-त्या ठिकाणी ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह टाळण्यासाठी मोहिम उघडतात.
राजस्थान पोलिसांनी नागरिकांनी दारू पिऊन गाडी चालवू नये यासाठी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "या नव वर्षाच्या स्वागतासाठी तुम्हाला अनेकांकडून दारू प्यायचं आमंत्रण मिळेल. पण विचार करुन हे आमंत्रण स्वीकार करा." या ट्वीटमध्ये एक गमतीशीर पोस्टर शेअर करण्यात आलं असून त्यामध्ये लिहिलं आहे की, "बुलाती है मगर जाने का नही."
#NewYearParty 💃🏻🕺🏼 में आपको मिलेंगे कई तरह के 🍾🍻 #INVITATION.
— Rajasthan Police (@PoliceRajasthan) December 28, 2021
मेरे दोस्त, सोच 🤔समझकर करना स्वीकार।#RajasthanPolice#DontDrinkAndDrive#PartywithCaution pic.twitter.com/MWsUIqn1Bf
राजस्थान पोलिसांनी आणखी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये राजेश खन्नाच्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचा वापर करण्यात आला आहे. 'पुष्पा आय हेट टीअर्स' या प्रसिद्ध डायलॉगचा वापर करत राजस्थान पोलिसांनी ट्वीट केलंय. नशा करुन ड्रायव्हिंग करु नका असं त्यात सांगितलं आहे. 'पुष्पा आय हेट बीअर' अशा प्रकारचं पोस्टर त्यांनी प्रकाशित केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :