Viral Video : वाढदिवस सलमानचा... भन्नाट डान्स जेनेलियाचा; व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिलाय का?
सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत जिनेलिया डिसूझाने सलमानसोबत भन्नाट डान्स करत चांगलीच धमाल केली आहे. आता या दोघांच्या या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
Salman Khan And Genelia D’souza Dance : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेल फार्महाऊसवर एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये फक्त त्याचे काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आता या पार्टीचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यावरून भाईच्या वाढदिवसाची भव्यता किती आहे ते समजतंय. अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुखनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती सलमान खानसोबत डान्स फ्लोअरवर रॉक करताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये सलमान खान आणि जेनेलिया डिसूझा दोघेही मॅचिंग रंगाच्या टी-शर्टमध्ये डान्स करताना दिसत आहेत आणि दोघांनी निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली आहे. पार्टीत मस्त म्युझिक वाजत आहे आणि दोघे एकत्र बेभान होऊन नाचताना दिसत आहेत.
सलमान खान आणि जेनेलिया डिसूझाचा हा डान्स त्यांच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे आणि या व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा होत आहे.
View this post on Instagram
सोमवारी, 27 डिसेंबरला सलमान खानने त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला. सलमान खानच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी शनिवारी रात्री सलमान खानला विषारी साप चावला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर रविवारी सकाळी त्याला घरी सोडण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या :
- Prajakta Gaikwad : सदानंदाचा येळकोट! प्राजक्ता गायकवाडने जेजुरीत उचलली 42 किलोंची खंडा तलवार
- Cinemas In Delhi : उद्योगांप्रमाणेच सिनेमागृहे 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी; मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी
- Sunny Leone New Song : सनी लिओनी थिरकली Dushtu Polapain गाण्यावर, वर्षाच्या शेवटी चाहत्यांना केले घायाळ