एक्स्प्लोर

Viral News : सोने तस्करीसाठी अनोखी शक्कल, दाढी करण्याच्या ट्रीमरमध्ये लपवली बिस्किटे

Viral News : सोन्याच्या तस्करीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस दाढी करण्याच्या ट्रिमरमध्ये सोन्याची तस्करी करताना दिसत आहे.

Viral News : आजकाल लोक सोप्या मार्गाने पैसे कमवण्याची हौसेमुळे अनेकांना तुरुंगाची हवा खायला लागते. कमी वेळात जास्त पैसे मिळवण्यासाठी अनेकजण चुकीचा मार्ग निवडून अवैध तस्करी करतात. नुकतेच सोन्याच्या तस्करीचे एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीला शेव्हिंग ट्रिमरमध्ये (Shaving Trimmer) सोने घेऊन जाताना पकडण्यात आले आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या सोन्याच्या तस्करीच्या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीने सोन्याची तस्करी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवलेली पाहायला मिळत आहे. कस्टम विभागाच्या नजरेतून सोने वाचवण्यासाठी या व्यक्तीने शेव्हिंग ट्रिमरची मदत घेतली आहे. सोन्याचे तस्कर वेगवेगळ्या मार्गाने तस्करी करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. त्याचवेळी, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सीमाशुल्क विभागाने शेव्हिंग ट्रिमरमधून अर्धा किलो सोने जप्त केले आहे.

शारजाहून एअर अरेबियाच्या विमानाने हा व्यक्ती जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. जिथे कस्टम चेकिंग दरम्यान त्याच्याकडील तस्करी करत असलेले सोने पकडण्यात आले. त्यानंतर सामानाची कसून तपासणी केली असता, शेव्हिंग ट्रिमरमध्ये सोने आढळून आल्याने कस्टम अधिकारी चांगलेच चकित झाले.

सध्या या व्यक्तीकडून 491 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. ज्याची किंमत अंदाजे 25 लाख रुपये आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी त्या व्यक्तीने हे सोने बिस्किटांच्या रुपात ठेवले होते. या सोन्याच्या बिस्किटांना त्याने काळ्या कार्बन प्लास्टिक शीटच्या अनेक थरांनी लपवून ठेवली होती. सोशल मीडियावर एका व्यक्तीची तस्करी करण्याची कल्पना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
ACB Raid: रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई; 60 हजारांची लाच घेताना क्लास 1 'बंदर अधिकारी' जाळ्यात
रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई; 60 हजारांची लाच घेताना क्लास 1 'बंदर अधिकारी' जाळ्यात
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Maharashtra Cabinet decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय, पालघर जिल्ह्याचा झोन-4 काढून झोन- 1 मध्ये समावेश, चंद्रकांत पाटलांच्या खात्याबाबत महत्त्वाची घडामोड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय, पालघर जिल्ह्याचा झोन-4 काढून झोन- 1 मध्ये समावेश, चंद्रकांत पाटलांच्या खात्याबाबत महत्त्वाची घडामोड
Embed widget