एक्स्प्लोर

Rajasthan Tape Case | भाजप नेते संजय जैन ताब्यात, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यावरही गुन्हा

काँग्रेसने बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजपचे नेते संजय जैन यांची ऑडिओ टेप जारी केली होती. यात केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा आवाज असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यानंतर गजेंद्र शेखावत यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून भाजप नेते संजय जैन यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

जयपूर : राजस्थानमधील सत्तासंघर्ष शमताना दिसत नाही. काँग्रेसकडून गुरुवारी (16 जुलै) ऑडिओ टेपचा मुद्दा समोर आल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, काँग्रेसचे बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजप नेते संजय जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जयपूर पोलिसांनी संजय जैन यांना ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसने या ऑडिओ टेपमध्ये थेट केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचं नाव घेतलं आहे. जयपूरमध्येही शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या काल झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाचे बंडखोर आमदार भंवरलाल आणि विश्वेंद्र सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं की, "काही ऑडिओ टेप समोर आल्या आहेत, ज्यात भंवरलाल, संजय जैन आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा आवाज आहे. "पैशांची चर्चा झाली आहे," असं भंवरलाल शर्मा बोलत आहेत. तर "साहेबांना सांगितलं आहे," असं संजय जैन बोलत आहेत.या टेपमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, भाजप लोकशाहीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरजेवाला म्हणाले की, 'केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याविरोधात एसओजीमार्फत गुन्हा दाखल करा आणि तपासात दोषी आढळले तर अटक करा, अशी मागणी सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भंवर लाल शर्मा यांनी ही ऑडिओ टेप बनावट असल्याचा दावा केला आहे.

या पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या पक्षाच्या दोन आमदारांनाही पक्षातून निलंबित केल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, "भवंरलाल आणि विश्वेंद्र सिंह यांना पक्षातून निलंबित केलं असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे." तसंच पक्षाने सचिन पायलट यांनीही समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितल्यांच सुरजेवाला म्हणाले. विश्वेंद्र सिंह गहलोत सरकारमध्ये मंत्री होते.

मागील एक महिन्यापासून आमदारांच्या खरेदी-विक्रीचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप करत एसओजीही तपास करत असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं. भाजप आमदारांना खरेदी करुन जनतेने निवडून दिलेलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget