Indian Railways : या' मार्गांवर रेल्वे सुरु करणार 20 स्पेशल ट्रेन; आजपासून तिकीट बुकिंग सुरु
Indian Railways : भारतीय रेल्वे प्रवाशांची मागणी लक्षात घेत ट्रेन्सची संख्या सातत्यानं वाढवत आहे. पश्चिम रेल्वेनं 20 स्पेशल ट्रेन्ससाठी तिकिट बुकिंग आजपासून सुरु केलं आहे.
Indian Railways : भारतीय रेल्वे ही आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच तत्पर असते. प्रवाशांच्या मागण्या विचारात घेत भारतीय रेल्वे सातत्यानं ट्रेनच्या संख्येत वाढ करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या होत्या. आता त्या सर्व ट्रेन पुन्हा सुरु करण्याबाबत रेल्वेनं सुचना दिल्या आहेत. रेल्वेच्या विविध झोनमध्ये पॅसेंजर रेल्वे सेवाही सुरळीत करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेनं 20 स्पेशल ट्रेन सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून आजपासून तिकिट बुकिंग सुरु करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, या स्पेशल ट्रेन्समधून कन्फर्म तिकिट असणारे प्रवासीच प्रवास करु शकणार आहे.
वांद्रे टर्मिनस-गांधीधाम सुपरफास्ट स्पेशल ट्रेन :
ट्रेन क्रमांक 09073 वांद्रे टर्मिनस-गांधीधाम स्पेशल वांद्रे टर्मिनसवरुन दर शुक्रवारी दुपारी 14.40 वाजता सुटेल. ही ट्रेन 20 ऑगस्टपासून पुढील माहितीमिळेपर्यंत सुरु राहणार आहे. तर ट्रेन क्रमांक 09074 गांधीधाम-वांद्रे टर्मिनस स्पेशल दर गुरुवारी गांधीधाम येथून 20.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता वांद्रे टर्मिनसवर पोहोचेल. ही ट्रेन 19 ऑगस्टपासून पुढील माहितीमिळेपर्यंत सुरु राहिल.
मुंबई सेंट्रल-पोरबंदर स्पेशल ट्रेन :
ट्रेन क्रमांक 09035 मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानाकावरून दररोज 09.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.30 वाजता पोरबंदर या स्थानकावर पोहचेल. ही ट्रेन 18 ऑगस्टपासून पुढील सुचनेपर्यंत सुरु राहिल. तर ट्रेन क्रमांक 09036 पोरबंदर-मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेन ही पोरबंदर येथून 21.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.30 वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. ही ट्रेन 19 ऑगस्ट 2021 पासून पुढील सुचनेपर्यंत सुरु राहिल.
भावनगर टर्मिनस-ओखा स्पेशल ट्रेन :
भावनगर टर्मिनस-ओखा स्पेशल ही ट्रेन क्रमांक 09519 भावनगर येथून दररोज 22.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.55 वाजता ओखा येथे पोहोचेल. 18 ऑगस्टपासून ही ट्रेन धावणार आहे. तर ट्रेन क्रमांक 09520 ओखा-भावनगर टर्मिनस स्पेशल ही दररोज ओखा येथून 15.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.30 वाजता भावनगर टर्मिनसवर पोहोचेल. ही ट्रेन 19 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
मुंबई सेंट्रल-हिसार सुपरफास्ट स्पेशल ट्रेन :
ट्रेन क्रमांक 09229 मुंबई सेंट्रल-हिसार स्पेशल ट्रेन दर मंगळवारी आणि रविवारी मुंबई सेंट्रलवरून दररोज 23.00 वाजता सुटेल. ही ट्रेन 17 ऑगस्टपासून पुढील सूचना येईपर्यंत सुरु राहील. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09230 हिसार-मुंबई सेंट्रल स्पेशल ही ट्रेन प्रत्येक मंगळवार आणि गुरुवारी हिसार येथून सकाळी 10.00 वाजता सुटेल.
वलसाड-जोधपूर स्पेशल ट्रेन :
ट्रेन क्रमांक 09055 ही वलसाड-जोधपूर स्पेशल ट्रेन 17 ऑगस्टपासून दर मंगळवारी धावेल. ट्रेन क्रमांक 09056 जोधपूर-वलसाड ही स्पेशल ट्रेन 18 ऑगस्टपासून बुधवारी धावेल.
इंदौर-नागपूर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन :
ट्रेन क्रमांक 09213 इंदौर-नागपूर स्पेशल ट्रेन 22 ऑगस्टपासून दर रविवारी धावणार आहे. 23 ऑगस्टपासून गाडी क्रमांक 09214 नागपूर-इंदौर ही स्पेशल ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. ही ट्रेन दर सोमवारी धावेल.
डॉ.आंबेडकर नगर-नागपूर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन :
ट्रेन क्रमांक 09223 डॉ. आंबेडकर नगर-नागपूर प्रत्येक मंगळवारी धावणार आहे. ही ट्रेन 17 ऑगस्टपासून सुरु केली जाणार आहे. त्यासोबतच ट्रेन क्रमांक 09224 नागपूर-डॉ.आंबेडकर नगर स्पेशल ट्रेन 18 ऑगस्टपासून दर बुधवारी धावेल.
इंदौर-बिकानेर महामना स्पेशल ट्रेन :
ट्रेन क्रमांक 09333 इंदौर-बिकानेर स्पेशल ट्रेन 21 ऑगस्टपासून दर शनिवारी धावेल. तर ट्रेन क्रमांक 09334 बिकानेर-इंदौर येथून ही ट्रेन प्रत्येक रविवारी धावणार आहे. 22 ऑगस्टपासून ही सेवा सुरु होईल.
डॉ. आंबेडकर नगर-भोपाळ स्पेशल ट्रेन :
ट्रेन क्रमांक 09323 डॉ. आंबेडकर नगर-भोपाळ स्पेशल ही ट्रेन 18 ऑगस्टपासून दररोज सूरु राहील. ट्रेन क्रमांक 09324 भोपाळ-डॉ. आंबेडकर नगर या स्थानकावरून 19 ऑगस्टपासून दररोज धावेल.
दाहोद-भोपाळ विशेष ट्रेन :
ट्रेन क्रमांक 09339 दाहोद-भोपाळ स्पेशल ट्रेन सेवा 19 ऑगस्टपासून सुरु होईल. याशिवाय ट्रेन क्रमांक 09340 भोपाळ-दाहोद 18 ऑगस्टपासून दररोज सुरु होईल.
रेल्वेच्या वेळपत्रकाविषयीची अधिक माहीती जाणून घेण्यासाठी IRCTC.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.