एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गडकरी म्हणाले, नोकऱ्या कुठे आहेत? राहुल गांधी म्हणाले-उत्तम प्रश्न
‘गडकरीजी चांगला प्रश्न आहे. सर्व भारतीय नागरिक हाच प्रश्न विचारत आहेत’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं.
नवी दिल्ली: आरक्षण जरी दिलं तरी नोकऱ्या कुठं आहेत, असा सवाल विचारणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला.
‘गडकरीजी चांगला प्रश्न आहे. सर्व भारतीय नागरिक हाच प्रश्न विचारत आहेत’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं.
भाजपने सत्तेत आल्यानंतर तरुणांना नोकऱ्या देऊ असं आश्वासन दिलं होतं. तोच धागा पकडून, राहुल गांधींनी गडकरींच्या वक्तव्यावरुन, नोकऱ्या कुठं आहेत, हा प्रश्न देश विचारत असल्याचं नमूद केलं. याशिवाय काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुनही गडकरींवर निशाणा साधण्यात आला आहे. “नितीन गडकरी हे पहिले भाजपचे मंत्री आहेत, ज्यांनी सत्य आणि धैर्याने संपूर्ण देश विचारत असलेला प्रश्न उपस्थित केला”, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.Excellent question Gadkari Ji.
Every Indian is asking the same question.#WhereAreTheJobs?https://t.co/2wfhDxuA10 — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 6, 2018
राहुल गांधी यांनी यापूर्वीही रोजगाराच्या प्रश्नावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्ला केला आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणुकीपूर्वी प्रत्येकवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते म्हणजे एक जुमला होतं, असं राहुल गांधी म्हणाले होते. गडकरी काय म्हणाले होते? ''गरीब गरीब असतो. गरीबाला जात, पंथ, धर्म, भाषा नसते. धर्म कुठलाही असो, हिंदू असो, मुसलमान असो, मराठा असो.. एक क्लास असा आहे समाजात, ज्याला अंगावर कपडे नाहीत, खायला अन्न नाही. त्यामुळे असा विचार आलाय की त्या समाजामध्ये, एकदम जो गरीब आहे, त्याचाही काही विचार केला पाहिजे..'', असं गडकरी म्हणाले. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलनं करत आहे. औरंगबाद, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक येथे झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळणही लागलं होतं. तसेच आंदोलनाच्या मागणीसाठी काहींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांचा राज्य सरकारही गंभीरतेने विचार करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला विनंती करण्यात आली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलवलं जाईल. अधिवेशनात या अहवालावर सर्वानुमते चर्चा केली जाईल आणि काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिलं आहे. गडकरींचं स्पष्टीकरण दरम्यान, नितीन गडकरी यांच्या विधानाच्या बातम्या माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांनी (नितीन गडकरी) ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "जातीआधारित आरक्षण बदलून आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देण्याचा केंद्राचा कोणताही विचार नाही."We applaud Nitin Gadkari for being the first BJP Minister to speak the truth and courageously raise the question that we and the people of India have been asking, #WhereAreTheJobs?https://t.co/DC98xujWcd
— Congress (@INCIndia) August 6, 2018
संबंधित बातमी खायला अन्न नसलेल्या गरीबाचाही विचार करण्याची गरज : गडकरीMy attention has been drawn to certain media reports attributed to me. There is absolutely no thinking at the central government to change the reservation criteria from castes to economic conditions.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 4, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement