एक्स्प्लोर

Rahul Gandhi Speech: "धर्मसंकटात आहे, कोणाची निवड करू? रायबरेली की,...?"; राहुल गांधींच्या प्रश्नाला वायनाडच्या लोकांचं एका सुरात उत्तर

Rahul Gandhi Speech: राहुल गांधी यांनी आधी जनतेचे आभार मानले आणि मग कुठून खासदार व्हायचं, असा थेट प्रश्न जनतेलाच विचारला. मी द्विधा मनस्थितीत आहे, मी काय निवडू? रायबरेली की वायनाड? यावर एका सुरात जनतेनं उत्तर दिलं.

Rahul Gandhi Speech At Kerala Wayanad: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) दोन मतदारसंघातून लढवली. एक वायनाड, दुसरा मतदारसंघ म्हणजे, रायबरेली. केरळच्या वायनाडमधून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी जनतेला संबोधित केलं. राहुल गांधी यांनी आधी जनतेचे आभार मानले आणि मग कुठून खासदार व्हायचं, असा थेट प्रश्न जनतेलाच विचारला. राहुल म्हणाले की, मी द्विधा मनस्थितीत आहे, मी काय निवडू? रायबरेली की वायनाड? राहुल गांधींचा प्रश्न संपतो न संपतो, तोच समोर उपस्थित असलेल्या लोकांनी एका सुरात उत्तर दिलं... वायनाड. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले, मला तुम्हाला सांगतो की, माझ्या निर्णयावर वायनाड आणि रायबरेली दोन्ही मतदारसंघातील लोकं खूश होतील. मी वचन देतो. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद आणि मी लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेन. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळीही सार्वत्रिक निवडणुकीत दोन जागांवरून निवडणूक लढवली. केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकानं दोन्ही मतदारसंघांमधून विजय मिळवला. यापूर्वी 2014 मध्ये देखील राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, अमेठीत त्यांचा पराभव झाला आणि वायनाडच्या जनतेनं त्यांना खासदार म्हणून निवडून लोकसभेत पाठवलं. यावेळीही त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली आणि दोन्ही जागा जिंकल्या. नियमानुसार, राहुल गांधी एकाच जागेवरून खासदार राहू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींसमोर मोठं संकट आहे की, एक जागा (रायबरेली) हा गांधी घराण्याचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो, तर वायनाडमधील लोक राहुल गांधींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. अशा परिस्थितीत दोन्ही जागांच्या मतदारांशी त्यांचा थेट संबंध जाणवतो. सध्या राहुल गांधी ज्या जागेवरुन राजीनामा देतील, त्या जागेवरून पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करून विजय मिळविण्याचा प्रयत्न करण्याची संधी काँग्रेसला आहे.

वायनाडमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, या निवडणुकीत द्वेषाचा प्रेमानं पराभव केला आहे. अहंकाराचा पराभव नम्रतेनं होतो. खरं तर वाराणसीतील पराभवातून पंतप्रधान थोडक्यात बचावले हे सत्य आहे. अयोध्येत भाजपचा पराभव झाला, तेव्हा अयोध्येतील जनतेनंही आम्ही हिंसाचार आणि द्वेषाचे समर्थन करत नाही, असा संदेश दिला आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की, दिल्लीत स्थापन झालेलं सरकार एक अपंग सरकार आहे. विरोधकांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. नरेंद्र मोदींचा दृष्टिकोनही बदलेल हे तुम्हाला दिसेल. कारण भारतातील जनतेनं त्यांना संदेश दिला आहे.

यंदाच्या लोकसभेत राहुल गांधींचा दुहेरी विजय

राहुल गांधींनी उत्तर प्रदेश (UP) च्या रायबरेली लोकसभा जागेवर भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांचा 3 लाख 90 हजार 030 मतांनी पराभव केला होता. तर वायनाडमध्ये राहुल गांधींनी सीपीआय(एम)च्या ॲनी राजा यांचा पराभव केला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती, पण अमेठीमध्ये त्यांचा स्मृती इराणींनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर विजयी झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना दोन्ही मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ निवडावा लागेल. दरम्यान, यावेळी नेहरू-गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजलं जाणारे अमेठी पुन्हा काँग्रेसच्या खात्यात आलं आहे. येथून किशोरीलाल शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नकाSanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाला...
नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाला...
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.