एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

पंतप्रधान मोदी जेव्हा तुम्ही न्यायव्यवस्थेवर दबाव टाकता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांवर लाठीमार, गोळीबार घडवता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज शांत करण्याच प्रयत्न करतात, जेव्हा तुम्ही माध्यमांना धमकावतात त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज शांत करण्याचा प्रयत्न करतात.

दिल्ली : देशाच्या शत्रूंनी या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाहीत. देशातील शत्रूंना देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे अशक्य झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते काम करून दाखवले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. लहान दुकानदारांचा आवाज दाबण्याच प्रयत्न करतात म्हणजे तुम्ही देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भारमातेच्या आवाजाला, विद्यार्थ्यांना, माध्यमांना, न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न कराल, तर देश तुम्हाला याचे जबरदस्त उत्तर देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. सीएए आणि एनआरसी विरोधात काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन सुरु राहणार आहे. दिल्लीतील राजघाटावर आज सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी धरणे आंदोलन केलं. या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राहुल गांधी यांनी घटनेची प्रस्तावना वाचून दाखवली. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी जेव्हा तुम्ही न्यायव्यवस्थेवर दबाव टाकता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांवर लाठीमार, गोळीबार घडवता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज शांत करण्याच प्रयत्न करतात, जेव्हा तुम्ही माध्यमांना धमकावतात त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज शांत करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही भारतातील कोट्यावधी तरुणांचा रोजगार हिसकावून घेता, नोटाबंदी करता, देशातील उद्योजकांना, लहान दुकानदारांचा आवाज दाबण्याच प्रयत्न करतात म्हणजे तुम्ही देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जिथपर्यंत कपड्यांचा प्रश्न येतो मोदीजी, संपूर्ण देश तुम्हाला तुमच्या कपड्यांवरून ओळखतो. दोन कोटींचा सुट भारतातील जनतेने नाहीतर तुम्ही घातला होता. हा देश एक आहे. तुम्ही देशाला उत्तर द्या, कोट्यावधी विद्यार्थ्यांना उत्तर द्या, तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला, रोजागाराला काय केले? का हे नष्ट केले? देशाचा विकासदर तुम्ही खालवला आहे. तरुणांना रोजगार न मिळण्याचे कारण तुम्ही सांगायला हवे. तुम्ही रोजगार देऊ शकला नाहीत, अर्थव्यवस्थेला चालवू शकला नाहीत. त्यामुळेच तुम्ही द्वेषामागे लपत आहात. त्यामुळेच तुम्ही देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Embed widget