Rahul Gandhi : अस्सल मटणाचा बेत... लालू प्रसाद यांची खास रेसिपी अन् राहुल गांधी बनले 'शेफ'
Rahul Gandhi Meets Lalu Yadav : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यांच्या खास रेसिपीनुसार मटण तयार केलं.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मटण (Mutton) बनवलं. लालू प्रसाद यादव (Lalu Yadav Special Mutton Recipe) यांनी राहुल गांधी यांना मटण बनवण्याची (Rahul Gandhi Cooked Mutton) खास रेसिपी सांगितली, त्यानुसार राहुल गांधी यांनी मटण बनवलं.
लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधी यांची भेट
राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबतच्या खास मुलाखतीचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये दोन्ही नेते राजकीय 'मसाल्यां'वर चर्चा करताना दिसत आहेत. लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खास रेसिपीचं बनवलेलं मटण खाऊ घालताना आणि राजकीय मसाल्यांचा अर्थ समजावून सांगितला. यासोबतच अन्यायाविरुद्ध लढत संघर्ष करण्यासाठीही सांगितलं.
राहुल गांधी यांनी बनवलं मटण
राहुल गांधी यांनी शनिवारी लालू प्रसाद यादव यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडीओ यूट्यूबवरही प्रसिद्ध केला आहे. दोन्ही नेते मटण बनवत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दिल्लीतील राज्यसभा सदस्य आणि लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी मटण तयार केलं. व्हिडीओमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव म्हणतात की, त्यांनी हे मटण बिहारहून मागवलं आहे.
लालू प्रसाद यांची खास रेसिपी अन् राहुल गांधी बनले 'शेफ'
राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकांटवर खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'लोकप्रिय नेते, लालूजी यांच्याशी त्यांची खास रेसिपी आणि 'राजकीय मसाला' यांवर मनोरंजक संभाषण. गरीब, वंचित, अल्पसंख्याक आणि महिलांसाठी भारताची दृष्टी एक आहे - समानता, प्रगती आणि सक्षमीकरण. लालूजींसोबतच्या माझ्या खास भेटीचा संपूर्ण व्हिडीओ यूट्यूबवर पाहा.'
राहुल गांधी यांची पोस्ट
लोकप्रिय नेता, लालू जी से उनकी सीक्रेट रेसिपी और ‘राजनीतिक मसाले’ पर दिलचस्प बातचीत हुई।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 2, 2023
ग़रीबों, वंचितों, अल्पसंख्यकों और महिलाओं के लिए INDIA की सोच एक है - समानता, प्रगति और सशक्तिकरण।
लालू जी से मेरी ख़ास मुलाक़ात का पूरा वीडियो यूट्यूब पर देखें: https://t.co/5RbVDqVfY0 pic.twitter.com/59jekdEBgQ
राहुल गांधी आणि लालू यादव यांची खास भेट
राहुल गांधी लालू प्रसाद यांना विचारतात की, तुम्ही पहिल्यांदा स्वयंपाक कधी शिकलात? यावर लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं की, “मी वयाच्या सहाव्या वर्षी स्वयंपाक शिकलो. माझे भाऊ पाटण्यात काम करायचे, मी त्यांच्यासोबत आलो, तिथे स्वयंपाक शिकलो. लालू प्रसाद यादव यांनी पुढे सांगितलं की, बिहारी खाद्यपदार्थांव्यतिरिक्त त्यांना थाई फूडही आवडतं.