Rahul Gandhi Convicted : मोदी आडनावावरून विनोद करणं भोवलं; राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा, सुरत कोर्टाचा मोठा निर्णय
Gujarat News: मोदी आडनावावरून विनोद करणं राहुल गांधींना भोवलं आहे
Gujarat News: मोदी आडनावावरून विनोद करणं राहुल गांधींना (Rahul Gandhi) भोवलं आहे. 2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सुरत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मोदी आडनावावरून टीका केली होती.
Gujarat | Surat District Court sentenced Congress MP Rahul Gandhi to two years of imprisonment in the criminal defamation case filed against him over his alleged 'Modi surname' remark.
— ANI (@ANI) March 23, 2023
He was later granted bail by the court. https://t.co/qmGNBIMTaF
राहुल गांधीनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरून टीका केला होती. राहुल गांधीविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली वरच्या कोर्टात जाण्यासाठी कोर्टानं राहुल गांधींना 30 दिवसांचा वेळ दिला आहे.
2019 साली राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'सर्व चोरांची आडनाव मोदीच कशी असतात', असं राहुल प्रचारसभेत म्हणाले होते. त्याविरोधात गुजरातमधील एका भाजप आमदारांनं पोलिसांत तक्रार केली होती. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. त्यावर आज सुरत सेशन्स कोर्टानं निकाल दिला आहे. राहुल गांधी कोर्टात म्हणाले, कोणाच्या भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही
कॉंग्रेस नेत्यांची तातडीने बैठक
कॉंग्रेस नेत्यांची थोडयाच वेळात बैठक होणार आहे. राहुल गांधी यांना कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर तातडीने या प्रकरणी बैठक बोलवण्यात आली. मुंबई कॉंग्रेस कार्यालयात बैठक होणार आहे. कॉंग्रेस चे नेते विधान भवनातून बैठकीसाठी रवाना झाले.
काँग्रेस (Congress) जेलभरो आंदोलन करणार
काँग्रेस जेलभरो आंदोलन करणार आहे. राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे. राहुल गांधीविरोधात आयपीसीच्या कलम 499, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल गांधी आज तिसऱ्यांदा कोर्टात दाखल झाले.