एक्स्प्लोर
‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ वरुन राहुल गांधी आणि अरुण जेटलींमध्ये वाकयुद्ध
'ईझ ऑफ डूइंग बिझनेस'च्या रँकिंगवरुन राहुल गांधींनी प्रसिद्ध शायर गालिब यांच्या एका शेरची आठवण करुन देत मोदी सरकारवर निशाणा साधला. तर अर्थमंत्री अरुण जेटलींनी यूपीए सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची आठवण करुन दिली.
नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेचा 'ईझ ऑफ डूइंग बिझनेस'चा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालानुसार, भारताला टॉप 100 देशांच्या यादीत स्थान मिळालं आहे. पण दुसरीकडे यावरुन देशात जोरदार राजकारण ही सुरु झालं आहे.
'ईझ ऑफ डूइंग बिझनेस'च्या रँकिंगवरुन राहुल गांधींनी प्रसिद्ध शायर गालिब यांच्या एका शेरची आठवण करुन देत मोदी सरकारवर निशाणा साधला. तर अर्थमंत्री अरुण जेटलींनी यूपीए सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची आठवण करुन दिली.
'ईझ ऑफ डूइंग बिझनेस'वरुन सरकारवर निशाणा साधण्यासाठी राहुल गांधींनी ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी गालिब यांचा शेर शेअर करताना म्हटलं की, “सर्वांना ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’चं सत्य माहिती आहे. पण स्वत: ला आनंदी ठेवण्यासाठी ‘डॉ. जेटलीं’चा हा विचार अतिशय चांगला आहे.”
राहुल गांधींच्या या ट्वीटला अरुण जेटलींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. अरुण जेटलींनी राहुल गांधींच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटलंय की, “यूपीए आणि एनडीए सरकारच्या कार्यकाळात हेच अंतर आहे. ज्यात ‘ईझ ऑफ डूइंग करप्शन’ची जागा ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ने घेतली आहे.”सबको मालूम है “ease of doing business” की हकीकत, लेकिन ख़ुद को खुश रखने के लिए "Dr Jaitley" ये ख्याल अच्छा है
— Office of RG (@OfficeOfRG) November 1, 2017
The difference between the UPA and NDA-“The ease of doing corruption has been replaced by the ease of doing business" — Arun Jaitley (@arunjaitley) November 1, 2017नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डूइंग बिझनेस'च्या क्रमवारी भारताने 30 अंकांनी जबरदस्त झेप घेऊन टॉप 100 देशांच्या यादीत स्थान मिळवलं. या रँकिंगमध्ये भारताने पहिल्यांदाच स्थान मिळवलं आहे. ताज्या क्रमवारीनुसार, 2 जून 2016 पासून ते 1 जून 2017 दरम्यान जगातील सर्व देशात जे आर्थिक सुधारणांचे कार्यक्रम राबवले गेले, त्यानुसार 190 देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. संबंधित बातम्या मोदी सरकारच्या या 4 निर्णयांमुळे भारत उद्योगात अव्वल! मोदी सरकारला दिलासा, ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ रँकिंगमध्ये भारत टॉप-100 मध्ये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement