एक्स्प्लोर
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता आहे.
![अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा Raghuram Rajan May Get Nobel In Economics Latest Update अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/25124257/raghuram-rajan.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण क्लॅरेवेट ऍनालिटिक्स या संस्थेनं नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केली असून त्यात रघुराम राजन यांच्या नावाचा समावेश आहे.
क्लॅरेवेट ऍनालिटिक्स अॅकॅडमी ही एक संशोधन संस्था आहे. ते आपल्या संशोधनावरून नोबेल पुरस्कारांच्या संभावित विजेत्यांची यादी तयार करतात. कॉर्पोरेट वित्त क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजन यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
रघुराम राजन यांना नोबेल पुरस्कार मिळाला तर अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते अमर्त्यसेन यांच्यानंतरचे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)