एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदी 'चोरांचे सरदार', राहुल गांधींचा पुन्हा हल्ला
याआधी राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'चोर' या शब्दाचा वापर केला होता. "गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है," असं राहुल गांधी म्हणाले होते.
नवी दिल्ली : राफेल विमान करारावरुन काँग्रेस सातत्याने भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहे. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला आहे. सोशल मीडिया, प्रेस कॉन्फरन्स, जाहीर सभा प्रत्येक ठिकाणी त्यांचे शाब्दिक वार सुरु आहेत. आरोप-प्रत्यारोप होत असतानाच राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत त्यांना 'कमांडर इन थीफ' अर्थात 'चोरांचे सरदार' असल्याचं म्हटलं आहे.
याआधी राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'चोर' या शब्दाचा वापर केला होता. "गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है," असं राहुल गांधी म्हणाले होते.
राहुल गांधी यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये राफेल कराराबाबत सांगितलं आहे. "या करारासाठी भारत सरकारने मला अंबानींच्या रिलायन्स या कंपनीचं नाव सुचवलं होतं आणि त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. यानंतर दसॉल्टने अंबानींसोबत चर्चा केली. भारत सरकारने सुचवलेल्या मध्यस्थाची निवड आम्ही केली," असं फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांचं म्हणणं असल्याचं फ्रेन्च डिजिटल व्हिडीओ पब्लिशर ब्रूट सांगत आहेत.
व्हिडीओमध्ये ब्रूट हे 'मीडियापार्ट' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमधील फ्रान्स्वा ओलांद यांच्या मुद्द्यांचा हवाला देत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना राहुल गांधी म्हणाले की, "कमांडर इन थीफबाबत हे दु:खद सत्य आहे." दुसरीकडे नरेंद्र मोदी सरकारने ओलांद यांचं कथित विधान फेटाळत म्हटलं की, "दसॉल्टने स्वत:च रिलायन्स डिफेन्सची निवड केली आणि यात सरकारची कोणतीही भूमिका नाही." खरंतर राहुल गांधी आणि काँग्रेस मागील अनेक महिन्यांपासून आरोप करत आहेत की, "मोदी सरकारने फ्रान्सची कंपनी दसॉल्टशी करार करताना 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी जास्त दराने केली. यामुळे सरकारी तिजोरीचं कोट्यवधींचं नुकसान झालं."The sad truth about India's Commander in Thief. pic.twitter.com/USrxqlJTWe
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 24, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement