Rachel Kaur : जॉबसाठी धडपड, रोजची विमानवारी अन् 700 किमी अंतर; जगाला थक्क करणारी भारताची 'सुपर वुमन' आहे तरी कोण?
Rachel Kaur : 700 किमी अंतर रोज विमानाने प्रवास, तरी तब्बल 41 हजारांचा फायदा; जगाला थक्क करणारी भारताची 'सुपर मॅनेजर' आहे तरी कोण?

Racheal Kaur : मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये लोकांना कामाच्या ठिकाणी जाताना लोकलमधील गर्दी, शिवाय कारने जाणारे असतील ट्रॅफिक सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, मलेशियात एक अशी महिला आहे जी कामावर जाण्या-येण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करते. रिचेल कौर असं मूळच्या भारतीय या जॉबसाठी रोज विमान प्रवास करतात. रिचेल कौर यांचा रोजचा प्रवास कसा असतो? त्यांना किती खर्च येतो? जाणून घेऊयात...
कामावर जाण्यासाठी सकाळी सहा वाजताची फ्लाईट
रिचेल कौर या एअर आशियाच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. रिचेल कौर त्यांच्या मुलांना वेळ देण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्व देतात. त्या सकाळी 4 वाजता उठतात. पेनांग ते सेपांग जाण्यासाठी रिचले कौर सकाळची सहा वाजताची फ्लाईट पकडतात.
मुलांना आणि कुटुंबियांना वेळ देण्यासाठी विमान प्रवास
रोज विमान प्रवासाने कामावर जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी रिचेल कौर या फक्त विकेंडला कुटुंबियांना भेटत होत्या. त्यानंतर त्यांनी विमान प्रवासाने कामावर जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यापूर्वी त्या फक्त विकेंडला पेनांग ते सेपांग प्रवास करायच्या. मात्र, त्यांना 11 आणि 13 वर्षांची दोन मुलं आहेत. त्यांच्यासाठी त्यांना आठवड्यात 5 दिवस प्रवास करत कामावर जाण्याचा निर्णय घेतला.
कामाच्या ठिकाणी त्यांना घर भाड्याने घेण्यासाठी 24 हजार ते 26 हजार रुपये खर्च करावे लागतात. मात्र, विमान प्रवास करण्यासाठी त्यांना एअर आशियाच्या स्टाफसाठी असणाऱ्या डिस्काऊंटचा फायदा होतो. रिचेल कौर प्रत्येक विमान प्रवास करताना RM50 खर्च करतात. म्हणजेच त्यांचा महिन्याच्या विमान प्रवासचा खर्च 474 यूएस डॉलर्स इतका आहे. टोटल विमान प्रवासात त्यांना 12250 रुपयांची बचत होते.
champions trophy 2025 : छातीवर तिरंगा अन् निळाशार रंग, टीम इंडियाची कडक जर्सी पाहिलीत का? पाकिस्तानच्या जर्सीची किंमत काय?https://t.co/0gwHjmTiCs
— ABP माझा (@abpmajhatv) February 12, 2025
काव्या मारनने झटक्यात खर्च केले 1 हजार कोटी! हैदराबादच्या मालकीणीने थाटात खरेदी केला आणखी एक संघ!https://t.co/XuIJhqOuLg
— ABP माझा (@abpmajhatv) February 12, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या























