Punjab Police : पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, चार दहशतवाद्यांना अटक
Punjab Police : पोलिसांनी अटक केलेल्या चार दहशतवाद्यांमध्ये कॅनडास्थित अर्श डल्ला आणि ऑस्ट्रेलियातील गुरजंत सिंग या दहशतवाद्यांचा समावेश आहे.
Punjab Police : स्वातंत्र्य दिनापूर्वी पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पंजाब पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने पाकिस्तान आयएसआय समर्थित दहशतवादी कृत्यांचा भांडोफोट केलाय. पंजाब पोलिसांनी चार दहशतवाद्यांना अटकही केली आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या चार दहशतवाद्यांमध्ये कॅनडास्थित अर्श डल्ला आणि ऑस्ट्रेलियातील गुरजंत सिंग या दहशतवाद्यांचा समावेश आहे. पंजाब पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून ती ग्रेनेड, एक आयईडी, दोन 9 एमएम पिस्तूल आणि 40 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही शस्त्रे जप्त केल्यानंतर किती मोठ्या हल्ल्याची तयारी केली जात होती, हे समजू शकते.
Ahead of #IndependenceDay, Punjab Police foils major terror threat and busts Pak-ISI backed terror module,with help of Delhi Police. 4 module members associated with Canada-based Arsh Dalla & Australia-based Gurjant Singh arrested . (1/2)
— Punjab Police India (@PunjabPoliceInd) August 14, 2022
अर्श डल्ला हा सक्रिय दहशतवादी आहे. मूळचा पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील आणि आता कॅनडामध्ये राहणारा डल्ला हा अनेक दिवसांपासून गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. पंजाब पोलिसांनी अर्श डल्लाच्या अनेक कृत्यांचा भांडाफोड केला असून त्याच्या जवळच्या साथीदारांना अटक केली आहे. या लोकांकडून यापूर्वीही आयईडी, ग्रेनेड, दारूगोळा आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
— Punjab Police India (@PunjabPoliceInd) August 14, 2022
सर्व राज्यांना अलर्ट जारी
स्वातंत्र्यदिनी सुरक्षा यंत्रणांना विशिष्ट अलर्ट मिळाले आहेत. दिल्लीसह देशातील सर्व राज्यांच्या पोलिसांना एजन्सींनी हे अलर्ट जारी केले आहेत. पाकिस्तानातून ड्रोनद्वारे भारताच्या विविध भागात काही आयईडी सापडल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी सर्व राज्यांच्या पोलिसांना, विशेषत: दिल्ली पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
3 hand-grenades (P-86), 1 IED & 2 - 9mm pistols along with 40 live cartridges have been recovered: @DGPPunjabPolice. #ActionAgainstGangsters (2/2)
— Punjab Police India (@PunjabPoliceInd) August 14, 2022