एक्स्प्लोर

पहिला बदला पूर्ण, पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडसह जैशच्या दोन दशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे.

पुलवामा : भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा पहिला बदला घेतला आहे. भारतीय जवानांनी पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरानचा खात्मा केला आहे. तसंच जैशचा आणखी एका दहशतवादी गाजी राशीदलाही ठार केलं आहे. दहशतवाद्यांनी लपण्यासाठी एका घरात आश्रय घेतला होता, तेच घर जवानांनी उद्ध्वस्त केलं आहे. कामरान हा काश्मीर खोऱ्यातील जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा कमांडर होता. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. पुलवामाच्या पिन्गलान परिसरात पहाटेपासून जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत 55 राष्ट्रीय रायफल्सच्या मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. तसंच एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता. मेजर डीएस डॉन्डियाल, हेड कॉन्स्टेबल सेवराम, शिपाई गुलजार अहमद, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरि सिंह अशी शहीदांची नावं आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर कामरान आणि गाजी रशीद पळ काढण्यात यशस्वी ठरले होते, तर आदिर डार हा दहशतवादी आत्मघाती हल्ल्यात ठार झाला होता. पहिला बदला पूर्ण, पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडसह जैशच्या दोन दशतवाद्यांचा खात्मा कामरान हा जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर आहे. पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राग या भागात तो सक्रिय होता. त्याने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे. 8 फेब्रुवारीला त्याने इंटरनेटवरुन संवाद साधला होता. तर गाजी रशीद हा जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तींपैकी एक होता. त्या युद्धनीती आणि आयईडी बनवण्याचं प्रशिक्षण तालिबानकडून मिळालं होतं. त्यामुळे या कामासाठी त्याला जैशचा सर्वात भरवशाचं समजलं जातं. गाजी रशीद 9 डिसेंबरलाच सीमा पार करुन काश्मीरमध्ये घुसला होता. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या शोधासाठी अभियान हाती होतं. दहशतवादी पिन्गलानमध्ये अतिरेकी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानंतर चकमकीदरम्यान जवानांनी दहशतवादी लपलेलं घरच उडवलं.

पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद

पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. संबंधित बातम्या जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, मेजरसह चार जवान शहीद पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य Pulwama terror attack : पुलवामा हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध, दहशतवादाविरोधात भारतासोबत Pulwama terror attack : सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावर विकी कौशल म्हणतो... पाकिस्तानविरुद्ध पहिली कारवाई, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला पाकिस्तानचा 'एमएफएन' दर्जा रद्द, 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय? Pulwama terror attack : ना विसरणार, ना माफ करणार; पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचं ट्वीट Pulwama terror attack : 'त्या' शहीद जवानाची कॅन्सरग्रस्त आई अजूनही आपल्या मुलाची वाट पाहतेय Pulwama terror attack : शहीद जवानांच्या पार्थिवांना गृहमंत्र्यांनी खांदा दिला, पार्थिवं पाहून अवघा देश हळहळला Pulwama terror attack : पत्नीला दोन महिन्यात परत येतो म्हणाला अन्... Pulwama terror attack : हा भारताच्या आत्म्यावरचा हल्ला : राहुल गांधी Kashmir Terror Attack : जम्मूमधल्या नौशेरामध्ये आयईडीचा स्फोट, मेजर शहीद 'त्या' शहीद मेजरचे पुढच्या महिन्यात लग्न होते, लग्नपत्रिका व्हायरल Pulwama Terror attack : हल्लेखोरांबाबत 'जैश..'चा म्होरक्या मसूद अजहर म्हणतो... जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, मेजरसह चार जवान शहीद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget