Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य
‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला.
जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये अवंतीपुरा भागात सीआरपीएफ जवानांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नसल्याचं मत फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं आहे.
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, "अंवतीपुरमधील हल्ल्याबाबत मला दु:ख आहे. मात्र ही आजची गोष्ट नाही. याठिकाणी रोज असं काहीतरी घडत असतं. या हल्ल्याला केवळ पाकिस्तान जबाबदार नाही. जोपर्यंत येथील समस्येतून योग्य मार्ग काढला जात नाही, हे संपणार नाही. बंदुकीने हा प्रश्न सुटणार नाही, तर चर्चेने हा प्रश्न सोडवता येईल. जम्मू काश्मीर मधील लोकांशी याबाबत बोलावं लागेल. आपल्या लोकांशी आपण बोलणार नाही तर कुणाशी बोलणार?"
गुरुवारी 3 वाजून 37 मिनिटांनी हा हल्ला झाला होता. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला.
व्हिडीओ
संबधित बातम्या Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद